छत्रपती संभाजीनगर

एआयचा बकासुर पुस्तकांच्या मुळावर ?

CD
ABD26J78662 (((( सायबर अलर्ट)))) स्कॅनिंगच्या नावाखाली ग्रंथांची कत्तल एआय आणि कॉपीराइट कायद्याच्या लढाईची इनसाइड स्टोरी .... महाभारतात बकासुर नावाचा एक भयंकर राक्षस होता. सध्या एआय कंपन्यांनी असेच बकासुराचे रूप धारण केले आहे आणि या कपन्यांच्या भक्ष्यस्थानी आहेत पुस्तकं आणि ग्रंथ. ऑस्ट्रेलिया आणि युरोपमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे बड्या ग्रंथविक्रेत्यांमध्ये खळबळ माजली आहे. त्याचे झाले असे, की मेटा आणि अँथ्रोपिक या मोठ्या एआय कंपन्यांनी ठोक प्रमाणात दुर्मीळ व आऊट ऑफ प्रिंट झालेल्या अनेक ग्रंथांची ठोकपणे ऑर्डर देऊन खरेदी केली आहे. ही खरेदी कोणत्या ग्रंथालयासाठी अथवा लायब्ररीसाठी नसून केवळ आपले ज्ञानभांडार अधिक समृद्ध व संपन्न करण्याच्या लालसेने आहे. आपण आपल्या वापरकर्त्यांना त्यांच्या प्रश्नांच्या उत्तरादाखल जी माहिती देतो, ती हळूहळू अपुरी, जुजबी, तोकडी व मर्यादित असल्याचे एआय कंपन्यांच्या ध्यानात येत आहे. अशा वेळी आपल्या वापरकर्त्यांना अधिक प्रभावी, नेमकी व समाधानकारक उत्तरे द्यायची असल्यास आपल्याकडे उपलब्ध असलेले ज्ञानभांडारदेखील व्यापक, भव्य व विपुल असावे असे एआय कंपन्यांच्या लक्षात आले. यामुळे जगभरात उपलब्ध असलेले सर्व दुर्मीळ ग्रंथ आणि पुस्तके युद्धपातळीवर खरेदी करण्याचा सपाटा या कंपन्यांनी लावला. बरं, ही पुस्तके स्कॅन करून आपल्या दफ्तरी साठवून कंपन्या थांबणार असत्या तर ठीक, पण स्कॅन झाल्यानंतर एआय कंपन्यांनी ही पुस्तके कापून नष्ट करण्यास सुरवात केली आहे. या प्रकाराने थेट कॉपीराइट कायद्याचा भंग होतो असा आरोप केला जाऊ शकतो. तथापि, खासगी अभ्यास, संशोधनपर लेखन, टीकात्मक परीक्षण किंवा समीक्षेसाठी केलेला पुस्तकांचा असा वापर कॉपीराइट कायद्यात अपराधाच्या व्याख्येत मोडत नाही. पण मग एखाद्या लेखकाने एआय कंपन्यांबाबत असा आक्षेप उपस्थित केल्यास, ‘आपण करत असलेले स्कॅनिंग हे नक्कल करण्यासाठी नसून आम्ही आमच्या एआय मॉडेल्सना प्रशिक्षित करत आहोत’ असा युक्तिवाद केला जाऊ शकतो. एआयच्या उगमासोबत कायदा कसा आकार घेतो हे बघणे रंजक ठरत आहे. मागे गुगल बुक्स या संकेतस्थळाने अशा स्वरूपाचे महत्त्वाकांक्षी स्कॅनिंग केले होते, पण त्या वेळी गुगलचा हेतू हा केवळ वाचकांना दुर्मीळ ग्रंथसंपदा उपलब्ध करून देणे हा होता. यावेळी मात्र एआय मॉडेल्सना आपल्या सेवा अद्ययावत करणे व स्पर्धेत टिकून राहण्याच्या ईर्षेने झपाटले आहे. ॲड. चैतन्य धारूरकर ९३२५२१३७५९

8th Pay Commission ला 10 महिने पूर्ण, सॅलरी-पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर काय झालं? जाणून घ्या लेटेस्ट अपडेट

IND vs AFG : जसप्रीत बुमराह 'फिट' न झाल्यास, कोण घेईल त्याची जागा? ३ जबरदस्त गोलंदाज शर्यतीत, एक तर जस्सी नसतानाच चमकतो...

MPSC पेपरफुटी प्रकरणात नरहरी झिरवाळांचे स्वीय सहाय्यक गणेश देवरे यांचा खुलासा; म्हणाले, ‘मी दोषी आढळल्यास...’

कुंभ, मीन अन् मेष राशीच्या लोकांची शनीच्या साडेसातीपासून सुटका कधी? जाणून घ्या टाइमलाइन

Marathi News Live Updates: भागलपूर आणि नौगछिया भागातील पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्र्याकडून हवाई पाहणी

SCROLL FOR NEXT