AI Deepfake Sakal
छत्रपती संभाजीनगर

AI Deepfake : ‘डीपफेक’वर अभिनेत्री टार्गेट; बाॅलिवूड, हाॅलिवूडमधील सर्वाधिक छायाचित्रे अन् व्हिडिओ

फेस स्वॅप करणारे ५० पेक्षा जास्त ॲप उपलब्ध आहेत.

- शेखलाल शेख

छत्रपती संभाजीनगर : देशभरात काही दिवसांपासून ‘डीपफेक’चा मुद्दा सर्वत्र चर्चिला जात असून त्यावर कठोर कायदा करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. इंटरनेटवर ‘डीपफेक व्हिडिओ’, छायाचित्रांची संख्या वाढली असून यात सर्वाधिक पॉर्न, न्यूड डीपफेक व्हिडिओ, छायाचित्र हे हॉलीवूड, बॉलीवूड, टॉलीवूड अभिनेत्रींचे आहेत.

अभिनेत्रींचे चेहरे स्वॅप करून त्याचे पॉर्न व्हिडिओ, छायाचित्रे तयार करून त्याच्या स्वतंत्र वेबसाइट तयार करण्यात आल्या आहेत. त्यासोबत फेस स्वॅप करणारे ५० पेक्षा जास्त ॲप उपलब्ध आहेत.

गुगलवर सर्च केल्यास डीपफेक व्हिडिओ, छायाचित्रे कशी तयार करता येतात याचे क्विक ट्युटोरियल, प्रत्यक्ष माहिती देणारे अनेक व्हिडिओ आहेत. सोबतच सोशल मीडियावरील सर्वसामान्य महिलांचेही फेस स्वॅप करून अश्लील छायाचित्रे तयार करण्यात येतात. त्यामुळेच सामाजिक जीवनात वावरणाऱ्या उच्चपदस्थ तरुणी, महिलांनी सजग राहण्याची गरज आहे.

सध्या प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये हमखास इंटरनेट सुविधा आहे. यात मोबाइलधारक हवे ते सर्च करू शकतात. अनेक वेळा अश्लील मजकूर, छायाचित्रे, व्हिडिओ दिसतात किंवा ते सर्च केल्या जाताहेत. मागील काही वर्षांत डीपफेक ही मोठी समस्या झाली आहे.

अभिनेत्री, अभिनेते, राजकीय व्यक्ती, उद्योजक, सर्वसामान्य महिला, प्रसिद्ध व्यक्तींचे डीपफेक व्हिडिओ तयार करण्याचे प्रकार वाढले आहेत. यामध्ये सर्वाधिक पॉर्न, अश्लील व्हिडिओ, छायाचित्रे ही हॉलीवूड, बॉलीवूड, टॉलीवूड अभिनेत्रींची आहेत.

हेच व्हिडिओ सर्वाधिक बघितले जातात. पॉर्नस्टारच्या चेहऱ्यावर अभिनेत्रीचा चेहरा स्वॅप करून हे व्हिडिओ अपलोड केले जातात. हा प्रकार इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे, की ते थांबविण्याचे मोठे आव्हान यंत्रणेसमोर आहे.

५० पेक्षा जास्त ॲप

सध्या डीपफेक, रिफेस करण्यासाठी अनेक वेबसाइट, ५० पेक्षा जास्त ॲप सहज उपलब्ध आहेत. यावर कुणाचाही चेहरा लावून फेक व्हिडिओ, छायाचित्रे तयार करतात येऊ शकतात. हे व्हिडिओ, छायाचित्रे कशी तयार करायची याची माहिती गुगल सर्च करून कुणीही मिळवू शकतो.

सर्च केल्यास यात ‘डीपफेक’संबंधी ‘क्विक ट्युटोरियल’ तसेच संपूर्ण माहिती देणारे व्हिडिओ आहेत. सध्या इंटरनेटवर डीपफेक व्हिडिओ मेकर, फ्री डीपफेक ॲप, डीपफेक सॉफ्टवेअर मोबाइल ॲण्ड पीसी, डीपफेक बेव, डीपफेक ऑनलाइन,

डीपफेक एआय ॲप, डीप एआय क्लॉथ रिमूव्हर, डीपफेक इमेज जनरेटर, डीपफेक ॲन्ड्राइड, न्यूड मॅगझीन असलेल्या वेबसाइट, ॲपचा बोलबाला आहे. शिवाय पॉर्न साइट्सवर सेलिब्रिटी किंवा ॲक्ट्रेसेस नावाने स्वतंत्र सेक्शनही आहेत.

आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वाढता वापर

आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा जसा चांगल्या कामासाठी वापर होतोय तसाच त्याचा न्यूड, पॉर्न व्हिडिओ, अश्लील छायाचित्र तयार करण्यासाठी वापर वाढला आहे. गुगल सर्च केल्यास ‘टॉप टेन एआय फेक न्यूड साइड’ची नावे येतात.

तसेच ऑनलाइन एआय फेक न्यूड कसे तयार करायचे याची माहिती येते. ‘एआय’मध्येसुद्धा सर्वाधिक अश्लील व्हिडिओ, छायाचित्रे अभिनेत्रींची आहेत. इतकेच नव्हे, तर बाजूला असलेला मूळ फोटो आणि त्याच्या बाजूला न्यूड फोटो अपलोड केला जातोय.

आमच्याकडे ‘डीपफेक’च्या तक्रारी आल्या नाहीत. मात्र, अश्‍लिल छायाचित्राच्या तक्रारी आल्या आहेत. कर्ज घेतल्याच्या प्रकरणात काही अश्‍लिल छायाचित्रे तयार करण्यात आली. त्यामुळे सोशल मीडीया वापरताना महिला, नागरिकांनी खूप काळजी घ्यायला हवी. टु टाईप व्हेरिफीकेशन ठेवायला हवे. अनोळखी व्यक्तींचे कॉल उचलू नये किंवा त्यांना आपली माहिती देवू नये.

— प्रवीणा यादव, पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे, छत्रपती संभाजीनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arif Khan Chishti : मुस्लिम तरुणाचा मोठा निर्णय! संत प्रेमानंद महाराजांना किडनी दान करण्याची तयारी, वाचा कोण आहे आरिफ खान?

Whatsapp Mirror : व्हॉट्सअ‍ॅपवर एक परमिशन अन् बँक अकाऊंट रिकामं, 'हे' फेमस फीचर ठरतंय मोबाईल हॅकिंगचं कारण

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

Ganesh Chaturthi 2025: गणपतीची तयारी, बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कसे गोळा कराल? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT