छत्रपती संभाजीनगर

एआय तंत्रज्ञानाची जोड देऊन उसाचे उत्पादन दुप्पट करणार

CD
((अँकर)) ------- तंत्रज्ञानाची जोड देत उसाचे उत्पादन दुप्पट करणार ------ शेतकऱ्यांचा निर्धार, ‘एआय’वर आधारित ऊस शेतीसाठी पाडोळीत शिवारफेरी व चर्चासत्र ----- सकाळ वृत्तसेवा धाराशिव, ता. ९ ः कृत्रिम बुद्धिमत्ता या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून उसाचे उत्पादन दुप्पट करायचे आणि पारंपरिक शेतीला छेद देत आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब करायचा, असा ठाम निर्धार पाडोळी (आ.) येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. बुधवारी (ता. नऊ) मौजे पाडोळी (आ.) येथे एआय तंत्रज्ञानावर आधारित ऊस पीक प्लॉट पाहणी, शिवारफेरी आणि शेतकरी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्याचा एकमुखी संकल्प केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक ॲड. नीलेश बारखडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. ------ शेतात पोचले कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान चर्चासत्रापूर्वी मान्यवर आणि शेतकऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर केलेल्या ऊस पिकाच्या शेताला भेट देऊन पाहणी केली. एआयच्या साह्याने उसावरील किडी व रोगांचे वेळेत निदान करणे, जमिनीच्या गरजेनुसार खतांचा अचूक वापर आणि पाण्याची बचत करून भरघोस उत्पादन कसे घ्यायचे, याचे थेट शेतात प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले. तंत्रज्ञानाच्या या वापरामुळे उत्पादन खर्च घटून उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होणार असल्याचे तज्ज्ञांनी पटवून दिले. या शिवारफेरी व चर्चासत्रासाठी कारखान्याचे संचालक मुकुंद पाटील, संचालक राहुल सूर्यवंशी, संचालक भारत गुंड तसेच माजी संचालक वसंत कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याशिवाय सतीश देठे, उत्तमराव पवार, विकास ढवळे, बालाजी स्वामी, दत्ता जावळे, शेषराव जावळे, मधुकर पाटील, वामन गाते, सोनार साहेब, शाहूराज गुंड आदी उपस्थित होते. ...... OSM26B06950 धाराशिव ः पाडोळी (आ.) येथे बुधवारी आयोजित एआय तंत्रज्ञानावर आधारित ऊस पीक प्लॉट पाहणी, शिवार फेरी आणि शेतकरी चर्चासत्रात मार्गदर्शन करताना तज्ज्ञ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pachod News : पोळ्याच्या आनंदावर दुष्काळाचे विरजण..! बैलांना आंघोळ घालायलाही नाही पाणी

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी चार युवक पाण्याच्या टाकीवर; सरकारच्या भूमिकेविरोधात संताप

Pune Crime : पतीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून पत्नीने संपविले जीवन

त्यांच्या मिसेस आमच्यासाठी चहा घेऊन आल्या... सचिन तेंडुलकरांच्या पाहुणचाराने भारावलेला निलेश साबळे; म्हणाला- जेव्हा ते आले...

SCROLL FOR NEXT