((((लोगो ः साहित्य, कला)))
---
ABD26J80631 ((((ओव्हरसेट)))
((((फोटो ओळ))) दूध डेअरी चौक ः ‘ऑल इंडिया परमिट’ पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी मोनिका सिंह, डॉ. नवनाथ भा. तुपे यांच्यासह मान्यवर.
---
‘ऑल इंडिया परमिट’ पुस्तकाचे प्रकाशन
---
दूध डेअरी चौक, ता. ३ ः मराठवाडा महसूल प्रबोधिनी सभागृहात शुक्रवारी (ता. दोन) सायकलपटू सुधाकर पवार यांच्या ‘ऑल इंडिया परमिट’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
अध्यक्षस्थानी लेखक डॉ. नवनाथ भा. तुपे होते. अहिल्यानगर येथील अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह आणि कमला नेहरू शिक्षण संस्थेचे सचिव बाबूराव नालमवार यांची प्रमुख उपस्थिती होती. सिंह म्हणाल्या,
‘‘साहसी प्रवासाचे यथार्थ चित्रण करणारे हे पुस्तक आहे. त्यात लेखकाने सर्वसामान्य माणसांचे भावविश्व रेखाटले आहे. पुस्तके वाचली गेली पाहिजेत. वाचता-वाचता माणूस लिहिता होतो. शिवाय वाचकांनी प्रेरणादायी पुस्तके आपल्या मुलांना वाचायला दिली पाहिजेत’’, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. सागर राजपूत यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रमासाठी सचिन देशमुख, सुजित जैन, घनश्याम चौधरी, ऋषिकेश पवार, भाऊसाहेब कदम, सचिन नेहे, प्रफुल्ल ढेपे आणि प्रकाश पवार यांनी पुढाकार घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.