छत्रपती संभाजीनगर

इस्त्राइल, स्वीडन, जर्मनीसह दहा देशांचे राजदूत आज औरंगाबादेत

गुंतवणूक, पर्यटनसंधींबाबत आज ‘ऑरा ऑफ ऑरिक’

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शहरासह परिसरात औद्योगिक क्षेत्रात विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर व्हावी यासाठी उत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. पर्यटन राजधानी औरंगाबादच्या परिसरातील औद्योगिक व पर्यटन विकासासाठी मोठा वाव आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी ‘ऑरा ऑफ ऑरिक’ या विदेशी गुंतवणूक व पर्यटनसंधींबाबत शनिवारी (२६ मार्च) परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील नेते, अधिकाऱ्यांसह दहा देशातील राजदूत या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.

दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर (डीएमआयसी) च्या औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटी (ऑरिक) अंतर्गत शेंद्रा व बिडकीन परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याला जागतिक पातळीवर प्रमोट करणे तसेच औरंगाबाद परिसरातील पर्यटनसंधींचा आढावा या परिषदेतून घेणे अपेक्षित आहे.

शनिवारी सकाळी शेंद्रा ऑरिकमध्ये ही परिषद होईल. उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे प्रमुख पाहुणे असतील. उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बलदेवसिंग, एमआयडीसीचे सीईओ पी. अनबलगन, एआयटीएलचे व्यवस्थापकीय संचालक ए. एस. रंगा नायक, एनआयसीडीसीचे उपाध्यक्ष अभिषेक चौधरी, एआयटीएलचे सहव्यवस्थापकीय संचालक जितेंद्र काकुस्ते, रशियन विकास परिषदेचे सदस्य अलेक्झांडर प्रेमिनोव, यूएसआयएसपीएफच्या संचालक सुरभी वहाळ, तैवान चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष जेनिफर मखेचा, जेट्रोचे महासंचालक मुनेनोरी मस्तुंगा, वाणिज्य आयुक्त स्वीस बिझनेस हब विजय अय्यर आदी उपस्थित राहतील.

या देशांच्या राजदूतांची उपस्थिती

चिआँग मिंग फूंग (सिंगापूर), झाक्यअस लिम (सिंगापूर), ऐना लेकवाल (स्वीडन), मरजा सिरक्का इनिंग (जर्मनी), योंग ओग किम (कोरिया), कोबी शोशानी (इस्त्राइल), अल्बटर्स विल्हेल्मस डी जोंग (नेदरलँड), अलेक्सी सुरोवत्सेव (रशिया), गोओर्गी द्रेअर (रशिया).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate Sports Minister: मोठी बातमी! माणिकराव कोकाटेंचा राजीनामा नाहीच; आता क्रीडामंत्रिपद सांभाळणार

Vice President Election: उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी होणाऱ्या निवडणुकीत कोण-कोण करणार मतदान? यादी झाली तयार!

Modi Cabinet Decisions: मोदी सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले मोठे निर्णय; अश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती!

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

सोलापूरकरांनो, रविवारी ‘हा’ मार्ग राहणार वाहतुकीसाठी बंद! वाहनांसाठी ४ पर्यायी मार्ग; पोलिस आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT