डॉ. बाबासाहेब आंबेडकर  sakal
छत्रपती संभाजीनगर

Ambedkar Jayanti 2023 : दोनशे फूट बॅनरच्या माध्यमातून मांडला बाबासाहेबांचा जीवनप्रवास

ना नेता ना कार्यकर्ता, केवळ महामानवाचे विचार!

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : कोणत्याही नेत्याचा फोटो नाही, कोणत्याही एका कार्यकर्त्याचे नाव नाही. केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचा जीवनप्रवास मांडणारे दोनशे फूट बॅनर शहरात लावण्यात आले आहे. यातून हर्सूल येथील तक्षशिला नगर व एकतानगर मित्रमंडळाने समाजात एक वेगळा संदेश दिला आहे.

राज्यात कोणत्याही महापुरुषांची जयंती किंवा पुण्यतिथी असो, यावेळी अभिवादनाचे छापलेले बॅनर आपल्याला जागोजाग दिसतात. या बॅनरवर नेते व कार्यकर्त्यांचा फोटो मोठा आणि महापुरुषांचा फोटो छोटा असे बॅनर झळकताना दिसतात. सध्या राज्यभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची जल्लोषात तयारी सुरू आहे. यात अनेक नेते, पदाधिकारी, जयंती उत्सव समिती, संस्थांच्या वतीने ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात येत आहे. या बॅनरमध्ये महापुरुषांचे फोटो छोटे आणि नेते,

कार्यकर्त्यांची फोटो मोठे असे चित्र आहे. परंतु याला अपवाद ठरणाऱ्या एक डिजिटल बॅनरची चर्चा सध्या शहरात होत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल येथील तक्षशिलानगर व एकतानगर येथील तरुण मित्रमंडळाने डॉ. आंबेडकरांच्या जीवनावरील कार्याचा आढावा घेणारे दोनशे फूट बॅनर छापले आहे. या बॅनरवर डॉ. आंबेडकरांचा शैक्षणिक प्रवास ते त्यांनी समाज, देशासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेणारा मजकूर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lindsey Graham Death : डोनाल्ड ट्रम्प यांच्या विश्वासू खासदाराचे निधन, भारताला दिली होती ५०० टक्के टॅरिफची धमकी

Solapur B-2 Land Regularization : कोटींच्या जमिनी आता दोन ते पाच हजारांत नियमित; 80 एकरांवरील पुनर्विकासाला हिरवा कंदील, सोलापूरच्या रिअल इस्टेटला मिळणार बूस्टर

Latest Marathi News Update : अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरीने जगभरातील रामभक्तांच्या भावना दुखावल्या- केजरीवाल

Sangli Weather Forecast Next 5 Days : कोयना, चांदोली धरण क्षेत्रात पावसाची विश्रांती! 24 ते 25 जुलैनंतर मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता, पाहा हवामान अंदाज

Thane DCC Bank : ठाणे जिल्हा बँकेवर भाजप-शिवसेना महायुतीचा झेंडा! रवींद्र चव्हाण-एकनाथ शिंदेंच्या 'चाणक्यनीती'मुळे बविआचा गेम ओव्हर, नवे अध्यक्ष कोण?

SCROLL FOR NEXT