छत्रपती संभाजीनगर

‘अंबिया बहारा’साठी फळपीक विमा योजना लागू

CD
‘अंबिया बहारा’साठी फळपीक विमा योजना लागू ----- द्राक्ष, मोसंबी, डाळिंब, केळी, आंबा व पपई पिकांचा समावेश; १५ ऑक्टोबरपासून अर्ज सुरू ---- सकाळ वृत्तसेवा ः धाराशिव, ता. ५ : हवामान बदलामुळे होणारे नुकसान टळावे आणि शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा मिळावी, यासाठी हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यात ‘अंबिया बहार २०२६’ची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अधिसूचित महसूल मंडळांमधील द्राक्ष, मोसंबी, डाळिंब, केळी, आंबा आणि पपई या सहा प्रमुख फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे. द्राक्ष बागायतदारांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर असून, उर्वरित पिकांसाठी पीकनिहाय मुदत निश्चित करण्यात आली आहे. ही योजना कर्जदार आणि बिगर कर्जदार अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. जे कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी होऊ इच्छित नाहीत, त्यांनी नोंदणीच्या अंतिम मुदतीआधी किमान सात दिवसआधी संबंधित बँकेकडे विमा हप्ता कपात न करण्याबाबतचे घोषणापत्र देणे बंधनकारक आहे. अन्यथा, सर्व कर्जदार शेतकऱ्यांचा सहभाग बंधनकारक मानला जाईल. ---- अवेळी पाऊस, तापमान व गारपिटीपासून कवच या योजनेअंतर्गत अवेळी पाऊस, कमी किंवा जास्त तापमान, सापेक्ष आर्द्रता, वेगाचा वारा आणि गारपीट यांसारख्या नैसर्गिक धोक्यांपासून फळबागांना विमा संरक्षण दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, गारपीट या हवामान धोक्यासाठी ज्या शेतकऱ्यांना अतिरिक्त संरक्षण हवे असेल, त्यांनी आपला नियमित व अतिरिक्त विमा हप्ता हा बँकेमार्फतच भरणे आवश्यक आहे. ----- फळपीकनिहाय विमा रकमा व अंतिम मुदत फळपिकाचे नाव...विमा संरक्षित रक्कम (रु. प्रति हे.) शेतकरी विमा हिस्सा (रु. प्रति हे.) अर्जाची मुदत द्राक्ष ३,८०,००० (गारपीट : १,२७,०००)...१५,२०० (गारपीट : ९,५२५)...१५ ऑक्टोबर मोसंबी...१,००,००० (गारपीट : ३३,०००)...८,५०० (गारपीट : १,६५०)...३१ ऑक्टोबर केळी...१,७०,००० (गारपीट : ५७,०००)...१४,४५० (गारपीट : २,८५०)...३१ ऑक्टोबर पपई...४०,००० (गारपीट : १३,०००)...३,४०० (गारपीट : ६५०)...३१ ऑक्टोबर आंबा...१,७०,००० (गारपीट : ५७,०००)...१४,४५० (गारपीट : २,८५०)...३१ डिसेंबर डाळिंब...१,६०,००० (गारपीट : ५३,०००)...१३,६०० (गारपीट : २,६५०)...१४ जानेवारी २०२७ ....... अधिसूचित महसूल मंडळे - आंबा, केळी, डाळिंब व द्राक्ष : संपूर्ण जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळांसाठी ही पिके अधिसूचित करण्यात आली आहेत. - पपई व मोसंबी : धाराशिव, केशेगाव, बेंबळी, येडशी, कळंब, तुळजापूर, नळदुर्ग, परंडा, भूम, वाशी, मुरुम इत्यादी ठराविक मंडळांसाठी ही पिके अधिसूचित आहेत. --- आवश्यक कागदपत्रे : बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्जासोबत आधार कार्ड, सातबारा उतारा, फळबागेचा अक्षांश व रेखांशसह फोटो (जिओ-टॅगिंग) आणि बँक पासबुकची प्रत जोडणे अनिवार्य आहे. अधिक माहिती व नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी शासकीय संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FlyDubai Co-Pilot Case : इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा कट; फ्लाईदुबईच्या को-पायलटला होणार 'फायरिंग स्क्वॉड'द्वारे मृत्युदंड?

Darvha News : नितेश राणेंच्या ताफ्यावर फेकल्या कोंबड्या; दारव्हा तालुक्यात ठाकरेसेनेची घोषणाबाजी; मच्छीमारांना मदत जाहीर करण्याची मागणी

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

LPG Rule: उत्तर प्रदेशमध्ये 1200 कुटुंबांचा गॅस पुरवठा रोखला; 413 कुटुंबांचे कनेक्शन तोडले, नेमकं कारण काय?

'दृश्यम ३' थिएटर गाजवतोय पण ओटीटीवर अचानक ट्रेंड होतोय अजय देवगनचा ११ वर्ष जुना चित्रपट; तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT