छत्रपती संभाजीनगर

''अमृत बाजार पेठ''चे धाराशिवमध्ये उद्घाटन स्थानिक उत्पादक आणि ग्राहकांसाठी ठरणार संजीवनी

CD
‘अमृत बाजारपेठ’चे धाराशिवमध्ये उद्‍घाटन स्थानिक उत्पादक आणि ग्राहकांसाठी ठरणार संजीवनी ः शेटे सकाळ वृत्तसेवा धाराशिव, ता. १४ : स्थानिक नागरिकांना सर्व प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू एकाच छताखाली उपलब्ध करून देणाऱ्या आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणाऱ्या ‘अमृत बाजार पेठ’चे रविवारी (ता. १३) थाटात उद्‍घाटन झाले. शहरातील आचार्य गल्ली येथील ऐतिहासिक राम मंदिर परिसरात हा सोहळा पार पडला. महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था ‘अमृत’ (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) आणि ‘ज्ञानदा सुशिक्षित बेरोजगार बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. ‘अमृत’चे विभागीय उपव्यवस्थापक ओंकार शेटे यांच्या हस्ते फीत कापून उद्‍घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सगुणा आचार्य लाभल्या होत्या. तर ‘ज्ञानदा’चे अध्यक्ष गोपाल आचार्य आणि ‘अमृत धाराशिव’चे उपव्यवस्थापक अजय कुलकर्णी यांची उपस्थिती होती. शेटे म्हणाले, की अमृत बाजारपेठ हा केवळ एक व्यावसायिक उपक्रम नसून स्थानिक उत्पादक, व्यावसायिक आणि ग्राहक यांच्यातील थेट संबंध प्रस्थापित करणारा एक भक्कम दुवा आहे. ‘अमृत’ प्रबोधिनीच्या माध्यमातून समाजातील सर्वसमावेशक घटकांच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. धाराशिवसारख्या वाढत्या शहरात अशा आधुनिक आणि एकाच छताखाली सर्व सुविधा देणाऱ्या बाजारपेठेमुळे स्थानिक रोजगार निर्मितीला आणि अर्थकारणाला मोठी गती मिळेल. ...... धाराशिव ः शहरात आयोजित ‘अमृत बाजारपेठ’मध्ये विक्रीस आणलेल्या वस्तूंची उपस्थितांना माहिती देताना उत्पादक महिला. फोटो क्रमांक ः OSM26B06983

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: NSE सह 5 IPO येणार! कोणता IPO देऊ शकतो सर्वाधिक Listing Gain? NSE IPO चा GMP किती?

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Marathi News Live Updates : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लालबागच्या राज्याच्या दर्शनाला

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या चरणांशी उंदीर का असतो? उंदीर मामा कसा बनला गणपती बाप्पाचे वाहन? जाणून घ्या रंजक कथा!

SCROLL FOR NEXT