छत्रपती संभाजीनगर

अमृतपेठ थेट बाजारपेठ’ उपक्रम

CD
लातुरात आजपासून ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’ लातूर, ता. ११ : स्थानिक उद्योजक व उत्पादकांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देत त्यांच्या व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने अमृत अर्थात महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी या सरकारच्या स्वायत्त संस्थेच्या वतीने लातूर येथे ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’ या विशेष प्रदर्शन व विक्री उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १२ व १३ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते रात्री ७ पर्यंत जुना औसा रस्ता भागातील विवेकानंद संस्कार संस्था सभागृह, लक्ष्मी कॉलनी येथे हा उपक्रम होणार आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लक्षित गटातील उत्पादक, विक्रेते आणि स्थानिक उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांच्या प्रदर्शन व थेट विक्रीसाठी व्यापक व्यासपीठ या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. या प्रदर्शनात कपडे, घरगुती खाद्यपदार्थ, कलात्मक वस्तू, विविध हस्तकला व स्वदेशी उत्पादनांचे स्टॉल उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे विविध प्रकारची उत्पादने एकाच ठिकाणी पाहण्यास व थेट खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन, स्थानिक उद्योजकांना बाजारपेठ आणि ग्राहकांना दर्जेदार उत्पादनांची थेट उपलब्धता या त्रिसूत्रीवर ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’ उपक्रमाची संकल्पना आधारित आहे. या माध्यमातून लघुउद्योजकांना आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी तसेच नव्या ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी महत्त्वाची संधी मिळणार आहे. हे प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी खुले असून प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन ‘अमृत’च्या वतीने करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

8 Feet Crocodile Spotted in Krishna River : औदुंबरच्या कृष्णा नदीच्या डोहात आढळली आठफुटी मगर; घाटावर दररोज उन्हात बसताना दिसल्याने भाविकांमध्ये खळबळ

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Sudden Underarm Pain: काखेत अचानक दुखायला लागलंय? साधी वेदना समजून दुर्लक्ष करू नका; 'या' कारणांमुळे होऊ शकतो त्रास

SCROLL FOR NEXT