छत्रपती संभाजीनगर

अंगणवाडी सेविका व

CD
आष्टीत अंगणवाडीच्या ४९ पदांसाठी भरती ---- सेविकेची चार, मदतनिसांची ४५ पदे रिक्त; ११ सप्टेंबरपर्यंत अर्जाची मुदत ----- आष्टी, ता. २ (बातमीदार) : एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प (ग्रामीण), आष्टीअंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनिसांची एकूण ४९ पदे भरण्यासाठी भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यात अंगणवाडी सेविकेची चार, तर मदतनिसांची ४५ पदे आहेत. पात्र महिला उमेदवारांकडून ३१ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर २०२६ या कालावधीत अर्ज मागविण्यात आले आहेत. अंगणवाडी सेविका पदासाठी दौलावडगाव खलाटवाडी, कापसी आणि बीडसांगवी येथे प्रत्येकी एक पद रिक्त आहे. तर मदतनीस पदासाठी पांढरी, हरिनारायण आष्टा, चिंचेवाडी, दौलावडगाव, सावरगाव घाट, देऊळगाव घाट, खडकवाडी, वनवेवाडी, पांगरा, पाटसरा, धानोरा, टाकळी अमिया, साबलखेड, डोंगरगण, गणगेवाडी, शेकापूर, कापसी, बेलगाव, कडा, देवीनिमगाव, खिळद, मांडवा, सुंबेवाडी, पुंडी, साकत, पारोडी, निमगाव बोडखा, घोंगडेवाडी, कोकरेवाडी, महादेववाडी, अंभोरा, घाटापिंपरी, मंगरूळ, जामगाव, दैठणा, धामणगाव, महाजनवाडी, पाटण सांगवी, किन्ही आणि बीडसांगवी येथील अंगणवाडी केंद्रांचा समावेश आहे. काही गावांमध्ये एकापेक्षा अधिक केंद्रांवर मदतनिसांची पदे रिक्त आहेत. सेविका व मदतनीस पदासाठी उमेदवार किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पदवी, पदव्युत्तर, डी.एड., बी.एड., एमएससीआयटी किंवा समकक्ष उच्च शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना नियमानुसार गुणांचा लाभ मिळणार आहे. संबंधित गावातील स्थानिक रहिवासी महिला उमेदवार असणे ही महत्त्वाची अट असून, सक्षम प्राधिकाऱ्याचा रहिवासी असल्याचा पुरावा अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. अर्जाच्या अंतिम दिनांकास उमेदवाराचे वय किमान १८ व कमाल ३५ वर्षे असावे. विधवा उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४० वर्षे आहे. अर्जासोबत जन्मतारखेचा पुरावा, शैक्षणिक प्रमाणपत्रे, रहिवासी प्रमाणपत्र, लागू असल्यास जात प्रमाणपत्र तसेच विधवा व अनुभवासंबंधी आवश्यक कागदपत्रे जोडावी लागणार आहेत. ----- २८ सप्टेंबरला यादी भरतीप्रक्रियेनुसार २८ सप्टेंबरला प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीवर २८ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबरदरम्यान हरकती व आक्षेप नोंदविता येतील. प्राप्त आक्षेपांची छाननी केल्यानंतर १२ ऑक्टोबरला गुणवत्ता यादीत सुधारणा करण्यात येणार असून, अंतिम निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाणार आहे. अर्ज एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प (ग्रामीण), आष्टी येथे सादर करावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Update: मुंबईचं हवामान अचानक बदललं, मुसळधार पावसाची सुरुवात; कसा असेल पुढील २ दिवसाचा अंदाज?

सर्किटचा ‘डार्क’ अवतार! अर्शद वारसीच्या ‘महाराज’ भूमिकेने वाढवलं ‘घमासान’चं गूढ, खाकी वर्दीत प्रतीक गांधींचा दमदार अंदाज

Maratha Reservation : सकल मराठा समाजाकडून लातूर जिल्हा बंदची हाक; मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा

Marathi News Live Updates : शिवसेना पक्षाच्या वादावर सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद नेमका काय ?

Maratha Reservation : पाण्याच्या टाकीवर चढून पेट्रोलची बाटली हातात घेत उपोषण; मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन

SCROLL FOR NEXT