answer key 2023 available for Talathi recruitment candidates from today Sakal
छत्रपती संभाजीनगर

Talathi Recruitment : तलाठी भरतीतील उमेदवारांसाठी आजपासून उत्तरतालिका उपलब्ध

उत्तरपत्रिका पाहण्यासाठी संबंधित उमेदवारांच्या ऑनलाइन लॉगिनमध्ये सोय करण्यात आली

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : राज्यभरातील ज्या उमेदवारांनी तलाठी भरती परीक्षा दिली आहे त्यांना २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबरदरम्यान उत्तरपत्रिका पाहण्यासाठी (अॅन्सर की) उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. उत्तरपत्रिका पाहण्यासाठी संबंधित उमेदवारांच्या ऑनलाइन लॉगिनमध्ये सोय करण्यात आली आहे.

उमेदवारांना काही हरकत असल्यास परीक्षा घेणाऱ्या कंपनीकडे नोंदविता येणार आहे. त्यासाठी १०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हयातून जवळपास १६ हजारहून अधिक उमेदवारांनी तलाठी पदासाठी परीक्षा दिली आहे.

तलाठी भरती परीक्षा पार पडल्यानंतर आता भूमी अभिलेख विभागाकडून पुढील प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार आता परीक्षा दिलेल्या उमेदवारांना अॅन्सर की पाहण्यासाठी सोय उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

उत्तरे पाहिल्यानंतर उमेदवारांना काही शंका, आक्षेप हरकत असल्यास परीक्षा घेतलेल्या टीसीएस कंपनीकडून लिंक उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्याकरिता आक्षेप अथवा हरकत नोंदवण्यासाठी १०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

आक्षेप योग्य असल्यास ही रक्कम संबंधित उमेदवाराना परत केले जाणार आहे. तसेच उमेदवारांकडून नोंदविण्यात आलेले आक्षेप टीसीएस कंपनीच्या समितीकडे जातील. या समितीकडून प्राप्त आक्षेपांचे निरसन केले जाणार आहे. अशी माहिती परीक्षा समन्वयकांनी दिली. दरम्यान ही प्रक्रिया झाल्यानंतर निकाल संकेतस्थळावर जाहिर केला जाणार आहे. संकेतस्थळावर जाहिर केलेला निकाल अंतिम राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेस बारामतीची पोटनिवडणूक लढवणार, उमेदवारही केला जाहीर; उद्या अर्ज भरणार

Mumbai News: ११३ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल इतिहासजमा! पूर्व-पश्चिम जोडणारा नवीन दुवा लवकरच आकारास येणार

आखाती युद्धाचा कांद्याला मोठा फटका; निर्यात ४५ टक्के घसरली, दर कोसळल्याने शेतकरी संकटात

Mumbai Weather Update : मुंबईसाठी पुढील ४८ तास महत्त्वाचे, कसं असेल तापमान? हवामान विभागाने दिली माहिती

म्हाडा ३० हजार घरे उभारणार, राज्य सरकारकडे १०० एकर जागेसाठी पाठपुरावा सुरू

SCROLL FOR NEXT