छत्रपती संभाजीनगर

पावसासाठी महिलांचा महादेवाला जलाभिषेक

CD
ABD26J78828 अंतरवाली टेंभी : येथील महिलांनी गोदावरीचे आणलेले पवित्र जल. ...... पावसासाठी महिलांचा महादेवाला जलाभिषेक रामसगावहून १० किलोमीटर अनवाणी पायाने आणले गंगेचे पवित्र पाणी अंतरवाली टेंभी, ता. ७ (बातमीदार) ः पावसाने दडी मारल्याने शेतकरी आणि ग्रामस्थ चिंतेत आहेत. त्यामुळे अंतरवाली टेंभी येथील महिलांनी अनवाणी पायी सुमारे १० किलोमीटर अंतरावर असलेल्या रामसगाव येथून गंगेचे पवित्र पाणी आणून गावातील महादेव मंदिरातील शिवलिंगचा जलाभिषेक केला. गेल्या काही दिवसांपासून परिसरात पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील पिकांवर मोठे संकट निर्माण झाले आहे. पावसाअभावी शेतातील पिके कोमेजण्याच्या मार्गावर असून शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. अशा परिस्थितीत गावातील महिलांनी पुढाकार घेत रामसगाव येथून गंगेचे पाणी आणले. महादेव मंदिरात विधिवत पूजा-अर्चा करून शिवलिंगावर जलाभिषेक करण्यात आला. यावेळी महिलांनी महादेवाच्या पिंडीवर सातत्याने पाणी अर्पण करत पावसासाठी साकडे घातले. या धार्मिक उपक्रमात गावातील भजनी मंडळाच्या महिलांसह मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. भजनी मंडळातील महिलांनी पारंपरिक भजने, अभंग आणि हरिनामाचा गजर केल्याने मंदिर परिसर भक्तिमय झाला. ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. महिलांनी सामूहिक प्रार्थना करून लवकरात लवकर समाधानकारक पाऊस पडावा, अशी महादेवाच्या चरणी विनवणी केली. गावातील ज्येष्ठ महिला, भजनी मंडळाच्या सदस्यांसह अनेक महिला या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Duleep Trophy Final: ३० चौकार अन् ७ षटकार... ईशान किशन बरसला, पण त्रिशतक हुकलं; संघाच्या तब्बल ७०० धावा पार

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

नालासोपारा शहराचे नाव बदलणार, प्राचीन ऐतिहासिक वारशाला नवी ओळख मिळणार; महापालिकेचे महत्त्वाचे पाऊल

Marathi News Live Updates: कोथरूड पोलीस स्टेशनच्या बाहेर कोथरूडकर एकवटले

SCROLL FOR NEXT