छत्रपती संभाजीनगर

प्रतिजैविकांच्या गैरवापराविरुद्ध विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली

CD
ABD26J81599 विद्यापीठ परिसर ः येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर जनजागृती रॅलीचा समारोप झाला. प्रतिजैविकांच्या गैरवापराविरुद्ध जनजागृती रॅली रसायन तंत्रज्ञान विभागाचा उपक्रम; दीडशे विद्यार्थ्यांचा सहभाग विद्यापीठ परिसर, ता. १८ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या रसायन तंत्रज्ञान विभागातर्फे राष्ट्रीय फार्मसी सप्ताह २०२६ निमित्त प्रतिजैविकांच्या गैरवापराबाबत आणि प्रतिजैविक प्रतिकारक्षमतेविषयी (एएमआर) जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीत दीडशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पथनाट्य आणि घोषणांद्वारे विद्यार्थ्यांनी औषधांचा जबाबदारीने वापर करण्याचा संदेश दिला. रॅलीला विभागातून सुरवात होऊन वाय कॉर्नर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत रॅली काढत समारोप झाला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्यात औषधांचा अयोग्य वापर, प्रतिजैविक प्रतिकारक्षमतेचे दुष्परिणाम आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांचे सादरीकरण केले. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घेणे, प्रतिजैविकांचा योग्य वापर करणे आणि निर्धारित उपचारक्रम पूर्ण करणे, असे आवाहन करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. सचिन भुसारी यांनी केले. विभागप्रमुख डॉ. भगवान साखळे यांनी प्रतिजैविकांच्या योग्य वापराचे महत्त्व सांगितले. रासेयो संचालक डॉ. सोमिनाथ खाडे प्रमुख पाहुणे, तर वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद सोमवंशी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी आरोग्यसेवेतील फार्मासिस्टच्या भूमिकेविषयी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. सचिन भुसारी, डॉ. विनय लोमटे, डॉ. गौरी कल्लावार, प्रा. विवेक राठोड, प्रा. गणेश पांढरे, रेणुका धाकणे, सुप्रिया आर्सुळ, नम्रता शिंदे, कनिका अरोरा आणि ट्विंकल तरोळे उपस्थित होते. डॉ. प्रीती साबळे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Union Election 2026 : गोकुळच्या मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा; मतपत्रीकेचे फोटो व्हायरल, नजर चुकवून मोबाईलवर काढले फोटो

Tukaram Munde Viral Video : तुकाराम मुंढेंचा VIDEO व्हायरल; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीशी संबंध काय?

मुंबईत नोकरी मिळाली, जॉइनिंग करण्याआधीच आक्रीत घडलं, २३ वर्षीय तरुणीला नराधमाने संपवलं, पुलावरून ओढत नेत...; कुडाळमध्ये काय घडलं?

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत शेतकऱ्यांच्या जीवन संपविण्याचे सत्र सुरूच; २५ दिवसांत १४ जणांनी संपवले जीवन

'आंब्यावानी नाव तुझं गोड बाई,जोगवा वाढ माई' गाण्यावर ऐश्वर्या नारकर यांचा सुंदर डान्स; हावभाव पाहून नेटकरी म्हणाले-

SCROLL FOR NEXT