छत्रपती संभाजीनगर

स्वयंम योजनेसाठी आता ऑफलाईन अर्ज ऑनलाईन पोर्टलवर तांत्रिक अडचणी; विद्यार्थ्यांना १३ नोव्हेंबरपर्यंत मुदत

CD
स्वयंम योजनेसाठी आता ऑफलाइन अर्ज ऑनलाइन पोर्टलवर तांत्रिक अडचणी; विद्यार्थ्यांना १३ नोव्हेंबरपर्यंत मुदत -- सकाळ वृत्तसेवा लातूर, ता. ४ : राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती (भटक्या जाती ‘क’ वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या (व्यावसायिक व बिगर व्यावसायिक) वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाकरिता सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी १३ नोव्हेंबरपर्यंत नियमित अर्ज स्वीकारले जाणार आहेत. या योजनेअंतर्गत ६०० विद्यार्थ्यांना लाभ दिला जाणार असून, महसुली विभाग शहरातील व उर्वरित ''क'' वर्ग महानगरपालिका क्षेत्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन, निवास व निर्वाह भत्ता म्हणून ५७ हजार रुपये, जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्यांसाठी ५० हजार रुपये, तर तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निश्चित केलेली रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्यात थेट वितरित करण्यात येणार आहे. ऑनलाइन पोर्टलवर येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे या योजनेचे अर्ज ऑफलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे उपरोक्त अटींची पूर्तता करणाऱ्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती (भटक्या जाती ‘क’ - धनगर समाज वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी ‘सावित्रीबाई फुले आधार योजने’साठी, तर धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांनी ‘पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजने’साठी आपले अर्ज १३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, लातूर येथे जमा करावे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक अभय अटकळ यांनी केले. योजनेच्या लाभासाठी या बाबी महत्त्वाच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी वसतिगृह प्रवेशास पात्र असावा, महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा तसेच सक्षम प्राधिकरणाने दिलेले जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे आणि विद्यार्थी ज्या ठिकाणी प्रवेशीत आहे, त्या शहराचा अथवा तालुक्याचा मूळ रहिवासी नसावा. याशिवाय विद्यार्थ्याने बारावीनंतरचे उच्च शिक्षण घेतलेले असणे आणि त्याला बारावीमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेले असणे अनिवार्य आहे. -----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC strike Diwali: ऐन दिवाळीत 'एसटी'चा संप! कर्मचाऱ्यांनी दिली राज्यव्यापी आंदोलनाची हाक

Asaduddin Owaisi: 'एका अब्दुलने मिशीगन जिंकले; आता दुसऱ्याने यूपीत कमाल करून दाखवावी!' ओवैसींना म्हणायचेय काय?

कोणाकडे तरी आकर्षित होऊन... वयाच्या ६० व्या वर्षी आशिष विद्यार्थी यांनी का केलं दुसरं लग्न? आता सांगितलं कारण, म्हणाले-

Latest Marathi News Live Update : अहिल्यानगर जिल्ह्यात आदित्य ठाकरेंकडून दुष्काळग्रस्त भागाची पाहणी

Mixed Gender Cricket Tournament : क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! मुलं आणि मुली खेळणार एकाच टीममधून; 'हा' नवा विचित्र नियम पाहून चक्रावून जाल!

SCROLL FOR NEXT