छत्रपती संभाजीनगर

गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्यास अटक

CD
गावठी कट्ट्यासह तीन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्यास अटक परभणी, ता. ३ : पालम पोलिस ठाण्याच्या हद्दीत गावठी कट्ट्यासह तीन जिवंत काडतुसे घेऊन फिरणाऱ्या एका व्यक्तीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. कैलास मारोती हनवते असे अटकेतील व्यक्तीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे आणि पोलिस उपनिरीक्षक चंदन परिहार यांच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत कैलास हनवते याच्याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पालम शहरातील बौद्धवाडा परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचा एक कट्टा, तीन जिवंत काडतुसे आढळून आली. प्राथमिक चौकशीत हा कट्टा बिहारमधून आणल्याचे त्याने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. घातपाताच्या उद्देशाने कट्टा बाळगल्याचेही तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पालम पोलिस ठाण्यात शस्त्र अधिनियमाच्या कलम ५-३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या कट्ट्याचा वापर कोणत्या कारणासाठी आणि कोणाच्या सांगण्यावरून करण्यात येणार होता, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणातील बिहार कनेक्शनसह अन्य बाबीही तपासात समोर येण्याची शक्यता आहे. या कारवाईत पोलिस अंमलदार महेश कवठाळे, राहुल परसोडे, माणिक वाघ, सचिन भदर्गे यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकीची मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह टीका, नेत्याला मंत्रिपद गमावण्याची वेळ

Curtly Ambrose : त्याने विकेट घेतली की आई घराबाहेर घंटा वाजवायची! २१ व्या वर्षी क्रिकेटला सुरुवात केलेला तो जगातील महान गोलंदाज बनला

Koyana Dam : महाराष्ट्रासह कर्नाटकातील कृष्णाकाठला मोठा दिलासा! कोयना धरण शंभर टक्के भरले, १०५.२५ टीएमसी पाणीसाठा पूर्ण

Life Horoscope: दीर्घायुष्य लाभलेल्या असतात ‘या’ राशीच्या व्यक्ती; आयुष्यात कितीही त्रास आला तरी लढण्याची ताकद कायम, तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates: एक दोन चपाटी मारणे म्हणजे हल्ला करणं नसतं- आनंद दवे

SCROLL FOR NEXT