sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : अहवालाचा शिक्षण विभागावर ‘असर’ ; पर्यवेक्षण यंत्रणा मजबूत करण्याच्या सूचना,शिक्षणाधिकाऱ्यांवर जबाबदारी

असर २०२३ अहवालाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण व्यवस्थेच्या पर्यवेक्षणाची यंत्रणा मजबूत करण्याच्या सूचना शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने दिल्या आहेत. या सूचना प्रभावीपणे अमलात येतील व त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी यांच्याकडे देण्यात आली आहे. देशातील २६ राज्यांतील २८ जिल्ह्यांतील १४ ते १८ वयोगटातील ३४ हजार ७४५ युवक-विद्यार्थ्यांच्या नमुना निवडी आधारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचे परिणाम प्रसिद्ध करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : असर २०२३ अहवालाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण व्यवस्थेच्या पर्यवेक्षणाची यंत्रणा मजबूत करण्याच्या सूचना शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने दिल्या आहेत. या सूचना प्रभावीपणे अमलात येतील व त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी यांच्याकडे देण्यात आली आहे. देशातील २६ राज्यांतील २८ जिल्ह्यांतील १४ ते १८ वयोगटातील ३४ हजार ७४५ युवक-विद्यार्थ्यांच्या नमुना निवडी आधारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचे परिणाम प्रसिद्ध करण्यात आले. यासाठी महाराष्ट्रातील नांदेड (ग्रामीण) या जिल्ह्यातील ६० गावांतील १ हजार ३७४ युवकांची नमुना निवड करण्यात आली होती.

सदर सर्वेक्षणासाठी कृती कौशल्य, मूलभूत क्षमता तसेच डिजिटल साक्षरता व कौशल्य हे प्रमुख निकष निर्धारित करण्यात आले होते. यापैकी कृती कौशल्य वगळता मूलभूत क्षमता व डिजिटल साक्षरता व कौशल्य या निकषाच्या आधारावरील नांदेड (ग्रामीण) या जिल्ह्याची व पर्यायाने राज्याची कामगिरी निराशाजनक दिसून आली. हे सर्वेक्षण केवळ एका जिल्ह्यापुरते मर्यादित असले तरी व ते काही मोजक्या निकषांच्या आधारे करण्यात आले असले तरी, त्यातून संपूर्ण राज्याच्या ग्रामीण भागातील स्थितीचे आकलन होऊ शकते, असे शिक्षण विभागाने म्हटले आहे. यासाठी शासन व अधिनस्थ संस्था शैक्षणिक गुणवत्ता वाढी संदर्भात पुरेपूर प्रयत्न करीत असताना अशा प्रकारचे परिणाम समोर येणे हे चिंताजनक आहे. याची शासन स्तरावर गंभीर दखल घेण्यात आली आहे. तसेच यासंदर्भात पर्यवेक्षण यंत्रणा मजबूत करण्यासाठी कडक सूचना करण्यात आल्या आहेत.

शिक्षण विभागाचे निर्देश...

  • अ) केंद्रप्रमुखांनी त्यांच्या अधिनस्थ शाळांना सातत्याने कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय अचानक भेटी द्याव्यात.

  • आ) कोणत्याही इयत्तेतील विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी जाणून घेण्यासाठी त्यांनी इयत्तेनुसार चाचणी घेऊन विद्यार्थ्यांना कितपत आकलन झाले आहे, याची तपासणी करावी.

  • इ) तपासणीचा अहवाल असमाधानकारक असल्यास संबंधित शिक्षकाला अधिकच्या प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याची शिफारस त्यांनी संबंधित शिक्षणाधिकाऱ्याकडे करावी.

  • ई) शिक्षणाधिकाऱ्यांनी उपरोक्तप्रमाणे शिफारस प्राप्त झाल्यास संबंधित शिक्षकास अधिकच्या प्रशिक्षणासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडे पाठवावे.

  • उ) शिक्षकाने अतिरिक्त प्रशिक्षण घेऊनही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत फारशी वाढ झाली नसल्याची बाब निदर्शनास आल्यास शिक्षणाधिकाऱ्याने तशा आशयाचा अहवाल शिक्षण संचालक (प्राथमिक/माध्यमिक) यांना सादर करावा.

  • ऊ) संबंधित शिक्षणाधिकाऱ्याने केंद्रप्रमुखाच्या पर्यवेक्षणाच्या कामकाजावर देखरेख व नियंत्रण ठेवावे, त्यांच्याकडून याबाबतचा अहवाल दरमहा प्राप्त होईल, याची दक्षता घ्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP Hike: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभऱ्याला आता किती भाव?

Kannad Ambadi Dam Water Crisis: अंबाडी धरणातील पाणीसाठा फक्त ८.९१ टक्के; जानेवारीनंतर कन्नड शहर व परिसरात तीव्र पाणीटंचाईची शक्यता

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर सांगली जिल्हा बँकेच्या मैदानात; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘जयंत पाटलांचा बाप आला’च्या घोषणा

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

Gangapur Crime: गंगापूर-खुलताबादच्या शेतवस्त्यांवर चोरट्यांची दहशत; आमदार प्रशांत बंबांकडून रात्रीची गस्त वाढवण्याचे निर्देश

SCROLL FOR NEXT