Navratri 2024 Asara Mata Temple sakal
छत्रपती संभाजीनगर

Navratri 2024 : स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आसरामाता मंदिर

Navratri 2024 : आसरामाता मंदिर स्थापत्यशास्त्राचा अद्वितीय नमुना असून, हे मंदिर जमिनीच्या आत ४० फूट खोल आहे. भाविक येथे नवस पूर्ण करण्यासाठी येतात, आणि वर्षभरात सुमारे सात लाख भाविक दर्शनासाठी भेट देतात.

सकाळ वृत्तसेवा

नवनाथ इधाटे

जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील फुलंब्री तालुक्यातील आळंद येथे प्रसिद्ध आसरामाता मंदिर हे स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून आसरामाता प्रसिद्ध आहे. या मंदिरात दर्शनासाठी व नवस पूर्ण करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते.

इतर मंदिरांची बांधकामे जमिनीच्या वरच्या भागात झालेली असताना हे मंदिर जमिनीच्या आतमध्ये जवळपास ४० फूट खोल असून, पाषाणातील या मंदिराचे बांधकाम कुणी केले, याबाबत काहीच माहिती नसल्याचे ग्रामस्थ सांगतात.

सरामाता मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे, या मंदिराच्या कामासाठी मोठमोठे काळे दगड (चिरे) वापरण्यात आले असून, मंदिराचे काम जमिनीखालून करण्यात आले आहे. आषाढ महिना सोडून बाकी इतर दिवस भाविकांची येथे गर्दी होते. पूर्वी येथे येणाऱ्या भाविकांना स्वयंपाकासाठी लागणारी भांडी या मंदिराच्या भूगर्भातून वर येत असल्याची आख्यायिका येथील जुनेजाणते लोक सांगतात.

देवीच्या दर्शनासाठी प्रत्येक माहेरवाशीण-सासुरवाशीण येते. मुलांची जावळं येथे उतरविण्यात येतात. मंदिराच्या विकासकामासाठी प्रशासनाने तीर्थक्षेत्र विकास निधीतून ‘क’ दर्जा देऊन ३२ लाखांच्या निधीला बारा वर्षांपूर्वी मंजुरी दिली होती.

जागृत देवस्थान

नवरात्रोत्सव सुरू झाल्यानंतर येथील मंदिरात दररोज पूजा, आरती, गरबा व इतर धार्मिक कार्यक्रम होत असल्याने भाविकांची मोठी रेलचेल सुरू होते. दरवर्षी उन्हाळ्यात चैत्र पौर्णिमेला मोठी यात्रा भरते. १५ दिवस चालणाऱ्या या यात्रेत राज्यभरातून व इतर राज्यांतूनही भाविक दर्शनासाठी येतात.

या मंदिराला ‘क’ दर्जा मिळाला असून, देखरेखीसाठी ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून काही वर्षांपूर्वी तीर्थक्षेत्र विकास निधीतून मंदिराकडे जाण्यासाठी सिमेंट रस्ता, भक्तनिवास, सरंक्षक भिंत, वृक्षलागवड व इतर विकासकामे केल्याने हा परिसर निसर्गरम्य झाला आहे. वर्षभरात जवळपास सात लाख भाविक येथे दर्शनासाठी येतात, अशी माहिती संस्थानच्या वतीने देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT