NND26B03655 नांदेड ः शैक्षणिक तारांगणाच्या माध्यमातून खगोलशास्त्राची ओळख करून घेताना विद्यार्थी.
----
नागार्जुना स्कूलच्या विद्यार्थ्यांना
घडविली अंतराळाची सफर!
----
सकाळ वृत्तसेवा
नांदेड, ता. १४ (बातमीदार) : विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्र आणि अंतराळ विज्ञानाविषयी आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने नागार्जुना पब्लिक स्कूलमध्ये शैक्षणिक तारांगणाचे आयोजन करण्यात आले होते. पुणे येथील सक्षम एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांना अंतराळाचे दृक्-श्राव्य माध्यमातून दर्शन घडविण्यात आले.
शाळेच्या परिसरात उभारलेल्या मोठ्या फुगवता येणाऱ्या घुमटामध्ये अत्याधुनिक प्रक्षेपण व ध्वनियंत्रणेच्या साहाय्याने अंतराळातील विविध दृश्ये सादर करण्यात आली. विद्यार्थ्यांना सूर्यमाला, आकाशगंगा, ग्रह, तारे, उपग्रह, हवामान बदल, अंतराळ याने आणि विविध अंतराळ मोहिमांची माहिती देण्यात आली. तसेच भारताच्या चांद्रयान मोहिमेची ओळख करून देण्यात आली. शालेय अभ्यासक्रमातील खगोलशास्त्राशी संबंधित संकल्पना प्रत्यक्ष दृश्यांच्या माध्यमातून समजून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. अवघड वैज्ञानिक संकल्पना सहज समजल्याने त्यांच्यात कुतूहल निर्माण झाले. या उपक्रमामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधनाची आवड वाढण्यास मदत झाली. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या अध्यक्षा शैला पवार, सचिव केशव गड्डम, प्रदीप पवार, श्रीकांत गड्डम, कनका दुर्गा देवी गड्डम, प्रभारी प्राचार्या मिताली देशपांडे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.