sambhaji nagar
sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये पर्यावरण संवर्धन करणारे ऑक्सिजन पार्क मध्ये

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : औद्योगिक वसाहत म्हटल्यानंतर नवनिर्मिती रोजगार, विकास या गोष्टी सर्वांच्या डोळ्यासमोर येतात. मात्र, तेथे पर्यावरणाचे प्रश्‍नही निर्माण होतात. यासाठी प्रत्येक कंपनी आपल्या परिसरात झाडे लावतात. शेंद्रा एमआयडीसीत स्कोडा कंपनीने पर्यावरणासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.

कंपनीने शेंद्र्यात ३४ एकरांत ७५ हजार विविध प्रकारांची झाडे लावत प्रदूषण, तापमान कमी करण्यासाठी हातभार लावला आहे. चार वर्षांपूर्वी १४ एकरात उभारलेल्या ऑक्सिजन पार्कमधील झाडे ४० फुटापर्यंत उंच झाली आहेत. यातून या परिसरातील तापमान काही अंशी कमी झाले आहे. तसेच या पार्कमध्ये विविध प्रकारचे फुलपाखरे दिसत असून पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत आहे.

स्कोडा वोक्सवॉगन कंपनीचा वाहनाचा ऑसंबलिगचा मोठा प्रकल्प आहे. यात हजारो लोकांना रोजगार मिळतो. कंपनीने मुरमाड जमिनीवर ऑक्सिजन पार्क, ग्रीन हब, ग्रीन फ्युचर पार्क हे तीन प्रकल्प उभारले. यात प्रमुख्याने वड,पिंपळ, चिंच, गुलमोहर, आपटा, सिरम, लिंब, काचनवर्ड, बाभूळ, बेहडा,कं दम, उंबर, पळस, पारिजातक, तुळस, मोगरा, ट्रेन ट्री, अशोका, बांबू असे विविध ५० प्रकारची झाडे लावली आहेत. स्कोडाने डिसेंबर २०१९ मध्ये शेंद्रा परिसरातील देवगिरी सहकारी उद्योजक सोसायटीच्या बाजूला असलेल्या १४ एकरात २५ हजार देशी विदेशी झाडांची लागवड करीत ऑक्सिजन पार्क उभे केले. एमआयडीसी परिसरात हा सर्वांसाठी मोठा प्रकल्प आहे. याचा फायदा एमआयडीसी परिसरात राहणाऱ्यांना होत आहे.

या पार्कमध्ये सव्वा दोन किलोमीटरचा वॉकपाथ तयार करण्यात आला आहे. सुरवातीला लावलेली दोन ते तीन फुटांची झाडांनी गगनभरारी घेतली आहे. साधारणतः ४० फुटापर्यंत ही झाले वाढली. वृक्षलागवडीमुळे या ठिकाणचे तापमान इतर भागापेक्षा अर्धा ते एक डिग्रीने कमी राहते. यानंतर कंपनीने अडीच ते तीन एकरात ११ हजार ५०० विविध प्रकारची रोपलागवड केली.

१७ एकरांत साकारतोय ग्रीन फ्युचर पार्क

ऑक्सिजन पार्क, ग्रीन हब साकारल्यानंतर ऑरिकतर्फे ऑरिक हॉलसमोर १७ एकरांत ग्रीनरी करावीत, यासाठी स्कोडाला सांगण्यात आले. डिसेंबर २०२३ च्या दुसऱ्या आठवड्यात या ग्रीन फ्युचर पार्कमध्ये ४० हजार झाडे लावण्यात आली. याच ठिकाणी ऑक्सिजन पार्कप्रमाणे दीड किलोमीटरचा वॉकपाथ तयार करण्यात आला आहे. कंपनीतर्फे तिन्ही प्रकल्प वाढीसाठी विशेष काळजी घेतली जात आहे.

ऑक्सिजन पार्कला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

स्कोडाने विकसित केलेल्या ऑक्सिजन पार्कची दखल घेत सीआयआय कंपनीने राष्ट्रीय स्तरावरील इको सिस्टम रिस्टोरेशनचा ॲवॉर्ड २०२१ मध्ये जाहीर केला होता. पार्कला स्थानिक उद्योजक, एमआयडीसीने साथ दिली. राज्यासाठी मॉडेल ठरेल, असा हा ऑक्सिजन पार्क आहे. या पार्कमुळे परिसरात जैवविविधता दिसून आले. या प्रकल्पासाठी कंपनीच्या बोर्डाचे संचालक, मॅनेजिक डायरेक्टर यांची साथ लाभत असल्याने हे प्रकल्प उभे राहत आहे.

शेंद्रा एमआयडीसीत मुख्य रस्त्याला दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात झाडे लावलेली आहेत. मोकळ्या जागेवर एमआयडीसीने मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करून औद्योगिक क्षेत्रात प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेतली आहे. तसेच महामंडळाकडून औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांनी झाडे लावण्यास मोकळ्या जागेची मागणी केल्यास महामंडळातर्फे सकारात्मक प्रतिसाद देऊन पूर्ण सहकार्य केले जाते. त्यातील एका भाग म्हणजे स्कोडाने मागणी केल्यानुसार जागा उपलब्ध करून देत त्यांना ऑक्सिजन पार्क तयार करून तेथील झाडांची काळजी घेत आहे. इतर उद्योगांनीही यासाठी पुढाकार घ्यावा.

— रामचंद्र गिरी, मुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT