छत्रपती संभाजीनगर

एथर एनर्जीने कर्मचाऱ्यांना दिले १.१४ लाख शेअर्स

CD
एथर एनर्जीने कर्मचाऱ्यांना दिले १.१४ लाख शेअर --- ‘ईएसओपी २०२५’ अंतर्गत वाटप, पेड-अप शेअर भांडवल ३९.६७ कोटींवर --- सकाळ वृत्तसेवा छत्रपती संभाजीनगर, ता. ५ ः इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक एथर एनर्जी लिमिटेडने पात्र कर्मचाऱ्यांना ‘एथर एनर्जी ईएसओपी २०२५ प्लॅन’अंतर्गत १ लाख १४ हजार ३५० इक्विटी शेअरचे वाटप केले आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने गुरुवारी (ता. एक) ठरावाद्वारे या वाटपास मंजुरी दिली. या संदर्भातील माहिती कंपनीने राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजाराला दिली आहे. या योजनेअंतर्गत स्टॉक ऑप्शनचा वापर केलेल्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक रुपया दर्शनी मूल्य असलेले हे शेअर देण्यात आले. नव्याने वाटप केलेले शेअर कंपनीच्या विद्यमान इक्विटी शेअरप्रमाणेच सर्व बाबतींत समकक्ष असतील. सेबीच्या सूचीबद्धता नियमांनुसार आवश्यक तपशीलही कंपनीने शेअर बाजारांना सादर केले आहेत. त्यानुसार हे वाटप ईएसओपीअंतर्गत असून, एकूण १ लाख १४ हजार ३५० इक्विटी शेअर्स जारी करण्यात आले आहेत. कंपनीच्या कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी पूजा अगरवाल यांनी शेअर बाजारांना याबाबतची माहिती दिली आहे. --- भांडवलात १.१४ लाखांची वाढ या शेअरच्या वाटपामुळे एथर एनर्जीचे पेडअप शेअर भांडवल ३९ कोटी ६६ लाख ३ हजार ७५१ रुपयांवरून ३९ कोटी ६७ लाख १८ हजार १०१ रुपयांवर पोचले आहे. कंपनीच्या एकूण इक्विटी शेअर्सची संख्या ३९ कोटी ६६ लाख ३ हजार ७५१ वरून ३९ कोटी ६७ लाख १८ हजार १०१ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Australia A विरुद्ध सुरु होणार ODI मालिका! हार्दिक, नमनची माघार; तरीही भारताची तगडी फौज मैदानात; जाणून घ्या डिटेल्स

Pune News : मनोज जरांगे यांना प्रश्‍न विचारल्‍याने ट्रोलधाड; रेखा कोंडे यांचा जरांगेंवर आरोप, टेंडर प्रक्रियेवरून मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

'…तर मी तिच्यासोबतच लग्न केलं असतं', बाळासाहेब मीनाताईंसमोर काय म्हणाले? वंदना गुप्तेंनी सांगितला 'तो' किस्सा

Leopard Attack : ओतूर येथे बिबट्याच्या हल्यात शेतकरी जखमी; बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाकडून दोन पिंजरे तैनात

Gangapur News : अवैध दारू विक्री वाढल्याने वरखेड गावात महिला व ग्रामस्थांनी काढला गांधीगिरी मोर्चा; दारू विक्रीविरोधात ग्रामसभेत ठराव मंजूर

SCROLL FOR NEXT