Ather Energy  sakal
छत्रपती संभाजीनगर

Ather Energy : बिडकीनमधील शंभर एकरात उभा राहणार ‘एथर’;स्वप्नील जैन यांची माहिती

इलेक्ट्रॉनिक वाहननिर्मितीतील आघाडीचा उद्योग समूह ‘एथर एनर्जी’ प्रकल्प बिडकीनमधील ऑरिक सिटीमध्ये शंभर एकरावर उभा राहणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : इलेक्ट्रॉनिक वाहननिर्मितीतील आघाडीचा उद्योग समूह ‘एथर एनर्जी’ प्रकल्प बिडकीनमधील ऑरिक सिटीमध्ये शंभर एकरावर उभा राहणार आहे. हा देशातील सर्वात मोठा प्रकल्प असून, दोन हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. लवकरच कंपनीचे काम सुरू होईल. पुढील दोन वर्षांत पहिले वाहन बाजारात येईल, असे उद्योग समूहाचे संस्थापक स्वप्नील जैन यांनी शनिवारी (ता. २९) पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मागील आठवड्यात मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एथर प्रकल्प छत्रपती संभाजीनगरमध्ये गुंतवणूक करणार असल्याचे शिक्कामोर्तब झाले. त्या पार्श्वभूमीवर जैन शहरात आले होते. याप्रसंगी माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष दुष्यंत पाटील, अर्पित सावे, अथर्वेशराज नंदावत, उत्सव माच्छर, एथरचे सीओओ संजय कुमार सिंह, सुब्रतो मित्रा यांची उपस्थिती होती.

जैन पुढे म्हणाले, २०१३ मध्ये आम्ही स्टार्टअप सुरू केले. २०१७ मध्ये पहिली गाडी बाजारात आणली. त्यावेळी भारतात ईव्हीचे तंत्रज्ञान विकसित झाले नव्हते. त्यामुळे काहीसा वेळ लागला. बंगळूर येथे मुख्य प्लांट आहे. त्यानंतर तमिळनाडूत दोन प्लांट सुरू केले. फॅमिली सेगमेंटला मिळणारा प्रतिसाद पाहता नवीन प्लांटसाठी जागेचा शोध सुरू केला होता. आता तो थांबला आहे.

छत्रपती संभाजीनगरच का?

येथील उद्योजकांनी एक दिवसात २०० कि.मी. फिरवून स्वप्नील जैन यांना सर्व शहर दाखविले. कनेक्टिव्हिटी कशी आहे, येथून नागपूर किती तासांत जाता येते, मुंबईचे अंतर किती या सर्व गोष्टी समजल्यानंतर शहराचे महत्त्व पटले. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरची निवड करण्यात आल्याचे दुष्यंत पाटील म्हणाले.

अशी आहे गुंतवणूक

  • दोन हजार कोटींची गुंतवणूक, चार हजार जणांना मिळणार रोजगार

  • प्रतिवर्ष १० लाख वाहननिर्मितीचे उद्दिष्ट

  • ११ वर्षांत २०० शहरांत कंपनीची डीलरशिप

  • सर्व प्रोडक्ट येथूनच निर्मितीचा प्रयत्न, फॅमिली स्कूटरला प्राधान्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: बॉक्सर्सची गोल्डन कामगिरी! ३० मिनिटांत ३ सुवर्णपदकं... अरुंद्धती चौधरीचे निर्विवाद वर्चस्व; भारताची Medal Tally मध्ये मोठी झेप...

Commonwealth Games 2026 : २२ वर्षीय प्रियाची पहिलीच राष्ट्रकुल स्पर्धा अन् सुवर्णपदक... शेतकऱ्याच्या लेकीने इतिहास घडवला

Deportation Rule: राष्ट्रीयत्वाची खात्री झाल्याशिवाय हकालपट्टी नाही; सर्वोच्च न्यायालयात केंद्राची भूमिका, निर्वासनासाठी ३ अटी अनिवार्य

Commonwealth Games 2026 : साक्षी चौधरीचा गोल्डन पंच; भारतीय सैन्यात असलेल्या पोरीने जग जिंकलं! ज्युदोत उन्नतीची कांस्य क्रांती

IND vs SL : श्रीलंकेचा रडीचा डाव! भारतीय संघाला पुरेसा सराव मिळू नये म्हणून लढवली शक्कल; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT