Aurangabad collector giving mask 
छत्रपती संभाजीनगर

कौतुकास्पद! मतदान केंद्राबाहेर मास्क न घातलेल्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी वाटले मास्क

प्रकाश बनकर

औरंगाबाद: जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 18 जागांसाठी सकाळी आठ वाजेपासून मतदान न सुरुवात झाली आहे. मतदान केंद्रावर मतदान मतदारांचा उमेदवारांच्या कार्यकर्त्यांची ही मोठी गर्दी जमा झाली आहेत. यात अनेकजण विना मास्क हॊते. सकाळी साडेदहा वाजता मतदान विभागीय सहनिबंधक कार्यालयात येथील मतदान केंद्रावर जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त त्यांनी भेट दिली.

यावेळी मास्क न घातलेल्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी मास्क वाटप केले. मास्क न घालणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी यांनी पोलिस आयुक्तांना दिल्या.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 18 जागांसाठी 48 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यातील दहा सेंटरवर मतदान प्रक्रिया सुरू आहेत. औरंगाबाद येथील विभागीय सहनिबंधक कार्यालयात दोन मतदान केंद्र असून त्या मतदान केंद्रावर लोक रांगा लावून व फिजिकल डिस्टन्स पाळत मतदानाचा हक्क बजावत आहेत. जिल्ह्यात एक हजार 114 मतदार आहेत.

शहरातील मतदान केंद्रास जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्त यांनी संयुक्त भेट दिली यावेळी प्रवेश करताच काही उमेदवारांनी मास्क लावलेला नव्हता. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी त्यांना मास्क लावा फिजिकल डिस्टन्स ठेवा असे खडे बोल सुनावले.

मतदान केंद्राबाहेरील दोन्ही बाजूस उभी असलेल्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनीही मास्क न घातल्यामुळे संतप्त झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांना चांगलेच सुनावत त्यांच्याजवळ असलेले मास्क  वाटप केले.

मास्क न वापरल्यास पाचशे रुपये प्रति दंड वसूल करा असे आदेश पोलिस आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.  मतदानासाठी रांगेत उभे असलेल्यांना फिजिकल डिस्टन्स ठेवण्याची ही सूचना पोलिस आयुक्तांनी केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : 'भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी कोणालाही सोडणार नाही'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कडक इशारा, रूपाली चाकणकरांबाबत काय म्हणाले?

5 वर्षांनी स्वामींच्या भूमिकेला दिला निरोप! अक्षयची 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेतून एक्झिट, 'हे' ज्येष्ठ अभिनेते साकारणार भूमिका

Latest Marathi News Live Update : सातारा जिल्हा परिषद निवडणूक मुद्द्यावर मंत्री शंभुराज देसाई आक्रमक

Pregnant Woman Rescue: माणुसकी अजूनही जिवंत; जीवन संपवण्यासाठी डोंगरावर चढलेल्या गर्भवतीचा वाचविला जीव, खाण ८० फूट खाेल, युवकांची काैतुकास्पद कामगिरी!

Stock Market Today: ट्रम्पच्या धमकीनंतर बाजारात धुमाकूळ! 1 मिनिटातच सेन्सेक्स 1500 अंकांनी कोसळला; कोणते शेअर्स तोट्यात?

SCROLL FOR NEXT