Aurangabad 15 corona Patient active in four days Sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : चार दिवसांत १५ कोरोना बाधित

महापालिकेने वाढवले चाचणी केंद्र

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शहरात पुन्हा एकदा कोरोना डोके वर काढतोय. गेल्या चार दिवसात पंधरा करोनाबाधित शहरात आढळून आले आहेत. त्यामुळे महापालिकेने चाचणी केंद्रांची संख्या वाढवली आहे. मुंबई, पुण्यापाठोपाठ आता औरंगाबादमध्ये देखील करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. गेल्या आठवड्यात एकाच दिवसात चार बाधित आढळून आले होते. त्यानंतर तीन-चार दिवस रुग्ण आढळून आले नाहीत. पण सहा जूनपासून पुन्हा रुग्ण आढळून येत आहेत.

पाच जूनला दोन रुग्ण आढळन आले. सहा जूनला पाच रुग्ण आढळून आले, त्यापैकी चार रुग्ण १८ ते ५० या वयोगटातील असून एक रुग्ण पन्नास वर्षावरील गटातील आहे. आठ जूनला चार रुग्ण आढळले. त्यापैकी दोन रुग्ण १८ ते ५० या वयोगटातील तर दोन रुग्ण पन्नास वर्षावरील गटातील आहेत. तसेच नऊ जूनला चार रुग्ण आढळून आले. त्यापैकी दोन रुग्ण १८ ते ५० वयोगटातील तर दोन रुग्ण पन्नास वर्षावरील वयोगटातील आहेत, असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले. वाढत्या रुग्णसंख्येमुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने कोरोना चाचणी केंद्रात वाढ केली आहे.

सध्या नऊ ठिकाणी नवीन केंद्र सुरु केले आहेत. छावणी आरोग्य केंद्र, सिडको एन- ११ आरोग्य केंद्र, सिडको एन- ८ आरोग्य केंद्र, कैसर कॉलनी दवाखाना, घाटी रुग्णालयाची मेडिसीन विभागाची इमारत, सिडको एन- २ कम्युनिटी सेंटर, पदमपुरा कोविड केअर सेंटर, मेल्ट्रॉन हॉस्पिटल, विमानतळ या ठिकाणी कोरोना चाचणी केंद्र सुरु करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

SCROLL FOR NEXT