छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : कार घुसली हाॅटेलमध्ये; एक ठार,दोन जण गंभीर जखमी

दीपक जोशी

लिंबेजळगाव (जि.औरंगाबाद) : उभ्या असलेल्या कारला वाचविण्याच्या प्रयत्नात पाठीमागून भरधाव आलेली कार दोन्ही हाॅटेलमध्ये घुसून एका भिंतीवर जाऊन आदळली. त्यात समोर खुर्चीवर बसलेल्या एकास कारने चिरडले. त्याचा जागेवरच मृत्यु, तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना औरंगाबाद-नगर महामार्गावर असलेल्या लिंबेजळगाव (ता.गंगापूर) येथे शनिवार (ता.३०) रोजी 4 वाजेच्या दरम्यान घडली. या विषयी माहिती की, मुख्य महामार्गावर असलेल्या लिंबेजळगाव येथे बारामतीहून औरंगाबादच्या दिशेने जात असलेली काळ्या रंगाची कार (एमएच12 एलएल 3832) ही रोडवर थाबंलेली होती. त्यात एकूण 6 प्रवासी हे सर्वजण चहा घेत असतानाच पाठीमागून गंगापूरकडुन (Aurangabad) औरंगाबादच्या दिशेने भरधाव वेगाने आलेली पांढऱ्या रंगाची कार ही गाडी समोरच्या वाहनासह चहा घेणाऱ्या प्रवाशांना वाचविण्याच्या प्रयत्नात सरळ रोडच्या बाजूला असलेल्या व्यंकटेशसह गुरूकृपा (Gangapur) या दोन्ही हाॅटेलमध्ये घुसली.

हाॅटेलसमोरच एका खुर्चीवर अय्युब शमशोद्यीन शेख (वय 45, रा लिंबेजळगाव) हे बसलेले होते. भरधाव जात असलेल्या त्या पांढऱ्या रंगाच्या कारने अय्युब यांना जोराची धडक दिली. त्यात अय्युब यांचा जागेवरच मृत्यु झाला. तर शेख चाॅद शेख प्यारू (वय 60, रा.लिंबेजळगाव) हे आपल्या दुचाकीवर गावाकडे जात होते. त्यांनाही सदर कारने ठोकरल्याने ते ही या अपघातात गंभीर जखमी झाले आहे. तर अन्य पादचारी शेख नजीर शेख नबी(वय 50, रा.लिंबेजळगाव) यांनाही धडक बसल्याने ते गंभीर आहेत. समोर थाबंलेल्या काळ्या रंगाच्या कारमधील सर्व सहाही प्रवासी या घटनेत बालंबाल बचावले. घटनेची माहिती मिळताच वाळूजचे पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण उबंरे, सहायक उपनिरीक्षक मोहन पाटील, पोलिस काॅन्स्टेबल प्रदीप बोरूडे, नांगरे आदींनी घटनास्थळी येऊन जखमींना उपचारासाठी घाटी दवाखान्यात पाठविले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT