pachod girl accident. 
छत्रपती संभाजीनगर

पाणी आणण्यासाठी गेलेल्या १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा विहिरीत पडून मृत्यू

हबीबखान पठाण

पाचोड (औरंगाबाद): विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या एकोणीस वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा पाणी शेंदताना पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना थेरगाव (ता.पैठण) शनिवारी (ता.तीन)  सकाळी सातच्या वाजेच्या सुमारास घडली.  कु.पूजा राम चोरमले असे मृत्यू झालेल्या महाविद्यालयीन तरुणीचे नाव आहे.

यासंबंधी अधिक माहिती अशी की, थेरगाव (ता.पैठण) शिवारात राम यशवंतराव चोरमारे हे आपल्या कुटुंबियांसह शेतात वस्तीवर वास्तव्य करून राहतात. त्यांची  बारावीत शिक्षण घेणारी मुलगी कु. पुजा चोरमारे ही नित्यनियमाप्रमाणे सकाळी उठून आपले घरकाम करून विजेचे भारनियमन असल्याने व घरी पाणी नसल्याने ती पाणी आणण्यासाठी आपल्या घराजवळील विहीरीवर गेली. ती पाणी शेंदत असताना तीचा तोल जाऊन, पाय घसरून ती विहिरीत पडली.

पाणी आणण्यासाठी गेलेली पूजा विहिरीवर जाऊन एक तास उलटला तरी, ती घरी न परतल्याने आई - वडिलांसह घरातील नातेवाईकांनी विहिरीकडे धाव घेतली. विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना विहिरीमध्ये पाणी शेदण्याची बादली व पुजाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले. समोरील दृश्य पाहून सर्वांनी हंबरडा फोडला. विहिरीवर ओरडण्याचा आवाज ऐकूण ग्रामस्थानीही घटनास्थळी धाव घेवून या घटनेची ग्रामस्थासह पाचोड पोलिसांना दिली.

ग्रामस्थांच्या मदतीने पुजाचा मृतदेह विहीरी बाहेर काढण्यात आला. त्यानंतर पुजाचा मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. वैद्यकिय  तपासणीनंतर मृत घोषित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Savarkar Statue Sangli : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला परवानगीचा अडथळा; राज्य, केंद्र शासनात हिंदुत्ववादी राज्यकर्ते, तरीही दोन वर्षांपासून फाईल रखडली

12 मुलं असूनही साऊथ सुपरस्टारला करायचं होतं दुसरं लग्न ! धाकट्या भावाने अभिनेत्रीला करायला लावला ब्रेकअप

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

SCROLL FOR NEXT