accident news. 
छत्रपती संभाजीनगर

लग्न सोहळ्याहून घरी जात असताना झालेल्या अपघातात डॉक्टर जागीच ठार

शेख मुनाफ

आडुळ (औरंगाबाद): अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार डॉक्टर जागीच ठार झाल्याची घटना औरंगाबाद-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील भालगाव फाटा (ता.औरंगाबाद) शिवारात शुक्रवारी (ता.५) रोजी मध्यराञीच्या सुमारास घडली. ञिंबक नरसिंग बमनात  असे मयत डॉक्टराचे नाव आहे.

ञिंबक नरसिंग बमनात वय ५० वर्षे,राहणार निहालसिंग वाडी (ता.अंबड) हे दुचाकी क्रमांक एमएच २० डिके ९८७४  शुक्रवारी (ता.५) रोजी डोंगरगाव ता. फुलंब्री येथे एका नातेवाईकाच्या लग्न सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपुन ते परत आडुळ कडे परत येत असतांना शुक्रवारी मध्यराञीच्या सुमारास त्यांच्या दुचाकीला भालगाव फाटा फाटा येथे एका अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली यात ञिंबक बमनात हे जागीच ठार झाले.

अपघाताची माहिती मिळताच चिकलठाणा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक श्री. पी. बी. ठुबे, चालक विशाल लोंढे यांनी घटनास्थळी धाव घेवुन वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची नोद चिकलठाणा पोलिस ठाण्यात घेण्यात आली असून पुढील तपास ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार नारायण कटकुरी, श्री. थोरे करीत आहेत. 

सदरील अपघात शुक्रवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडला, अपघात मध्यरात्री घडल्याने मृतदेह बराच वेळ घटनास्थळी पडुन होता त्यामुळे मृतदेहाच्या अंगावरुन दुसरे वाहन गेल्याने मृतदेह रक्तबंबाळ स्थितीत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Accident: कल्याणमध्ये भीषण अपघात, टेम्पोची दुचाकीला जोरदार धडक; एकाचा मृत्यू

"दारूमुळे नाटक इंडस्ट्री बरबाद झाली" अभिनेते सुनील तावडेंनी व्यक्त केली खंत "मी अत्यंत तिरस्कार..."

Mumbai Indians Playing XI: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात 'तगडा' खेळाडू दाखल, मात्र निर्माण झालाय गोंधळ; कोण IN, कोण OUT?

हेमंत ढोमेच्या सिनेमात सेमच स्टारकास्ट दिसते... इंडस्ट्रीतल्या गटबाजीवर श्वेता शिंदेचं स्पष्ट मत, म्हणते- माझी मुलगी जर...

एक्सपायरी संपलेली बिस्किटं अन् कोल्डड्रिंक्सवर नवीन तारीख लावून विक्री, तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT