छत्रपती संभाजीनगर

टँकर-दुचाकीची धडक, दूर फेकले गेल्याने दोघा तरुणांचा मृत्यू

नवनाथ इधाटे

फुलंब्री (जि.औरंगाबाद) : दूध घेऊन जाणाऱ्या टँकरने दुचाकीला जोरात धडक दिल्याने दुचाकीवरील दोन जाणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता.११) दुपारी तीन वाजेच्या सुमारास सिल्लोड-जळगाव रस्त्यावरील (Sillod) फुलंब्री (Phulambri) नजीकच्या बुलडाणा अर्बन बँकेच्या गोडाऊन समोर घडली. शेख असलम शेख अहमद (वय २४, भावसिंगपुरा औरंगाबाद), सलीम रफिक पठाण पठाण (वय ३४ रा. आसेफिया कॉलनी औरंगाबाद) अशी या अपघातात ठार झालेल्या दोन तरुणांची नावे आहे. वरील दुचाकीस्वार सिल्लोड येथे कामानिमित्त गेले होते. ते परत येत असताना मंगळवारी दुपारी ३ वाजता (Aurangabad) औरंगाबाद-फुलंब्री नजीक सिल्लोडकडे जाणाऱ्या दुधाचे टँकरने (क्र.एम.एच-१७ बी वाय-८७८७) दुचाकीला (क्र.एम.एच-२० एफएफ-८७९४) जोरात धडक दिली. (Aurangabad Accident News Two Youth Dies In Accident)

या धडकेत दुचाकीवरील दोघेजण दूर फेकल्या गेले. यात एका जणांच्या डोक्याचा अक्षरशः चुराडा झाला तर दुसऱ्या तरुणाचा एक हात तुटून दूरवर फेकल्या गेल्या होता. अपघाताची माहिती फुलंब्री येथील महात्मा फुले रुग्णवाहिका चालक विजय देवमाळी यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी अंजली शिंदे यांनी शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात दिले. याबाबत ट्रक विरुद्ध फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक मुद्दीराज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दामोधर वाघमारे, पोलिस कॉन्स्टेबल सय्यद मुजीब हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT