Aurangabad Agricultural Market Committee 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : माजी सभापतीसह १८ संचालकांना नोटिसा

दोन वर्षांतील ८८.८३ कोटींच्या खर्चाच्या चौकशी संदर्भातील प्रकरण

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कृषी उत्पन्न बाजार समितीत तत्कालीन सभापती राधाकिसन पठाडे आणि संचालक मंडळाच्या दोन वर्षांच्या कार्यकाळातील ८८.८३ कोटींच्या खर्चाची चौकशी करण्यात आली. यात बाजार समितीच्या कामकाजात अनियमितता व काहीअंशी आर्थिक नुकसान या बाबींसाठी कारणीभूत सभापती,संचालक मंडळ जबाबदार असल्याचे सिद्ध झाले आहे. यामुळे माजी सभापतीसह १८ संचालकांना जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.

हातमाळी ता.जि.औरंगाबाद येथील शेतकरी ज्ञानेश्‍वर बाजीराव म्हस्के यांनी पणन संचालकांकडे माजी सभापती यांच्या कार्यकाळातील ८८.८३ कोटींच्या कामाबाबत तक्रार दिली होती. यानुसार तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने चौकशी अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक डॉ. मुकेश बारहाते यांनी याची चौकशी करून त्याचा अहवाल हा पणन संचालक आणि राज्य सरकारला सादर केला होता.

सरकारतर्फे हा अहवाल जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांच्याकडे आला असून त्यांनी तक्रार तसेच ज्यांच्यावर ठपका ठेवला आहे, त्यांना पाठवून त्यांचे उत्तरही मागवले आहे. यात २५ विषयांवर ही तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार यांची चौकशी करण्यात आली त्यानंतर बाजार समितीच्या कामकाजात अनियमितता व काहीअंशी आर्थिक नुकसान अढळून आले आहेत. यामुळे आता या संचालकांना नोटीसाच्या माध्यमातून खुलासे मागण्यात आले आहेत.

या संचालकांना पाठवली नोटीस

माजी सभापती राधाकिसन पठाडे, माजी उपसभापती भागचंद ठोंबरे, माजी सभापती संजय औताडे, संचालक विकास दांडगे, गणेश दहिहंडे, नारायणराव मते, रघुनाथ काळे, दामोदर नवपूते, अलका दहीहंडे, संगीता मदगे, दत्तू तारो, शिवाजी वाघ, रामभाऊ शेळके, राहुल सावंत, बाबासाहेब मुगदल, प्रशांत रमेश चंद्रसोकीया, हरी दायमा,देविदास किर्तीशाही यांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.

हातमाळी येथील ज्ञानेश्‍वर म्हस्के यांच्या तक्रारीनूसार चौकशी करण्यात आली. याचा अहवाल आला असून या संदर्भात ज्यांच्यावर आरोपी होता. त्या सर्वांना नोटीसा पाठवून त्यांच्याकडून त्यांचे म्हणणे मागविण्यात आले आहेत.२९ जूलै पर्यंत या सर्व संचलकांनी म्हणणे मांडावे लागणार आहे.

- अनिलकुमार दाबशेडे, जिल्हा उपनिबंधक

विद्यमान मुख्य प्रशासकाने त्यांच्या मामाच्या माध्यमातून ही तक्रार दिली आहे. केवळ आमच्या संचालक मंडळास मुदत वाढ मिळू नयेत म्हणून ही तक्रार केली होती. चौकशी कुठलाही भ्रष्टाचार झालेला नाही असा अहवाल आला आहे. आम्ही जर भ्रष्टाचार केला असेल, तर गुन्हे दाखल झाले असते.आमचे काम स्वच्छ आहेत.

-राधाकिसन पठाडे, माजी सभापती, बाजार समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT