Aurangabad Agriculture Department schemes Minister Abdul Sattar Review Meeting  
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : कृषी विभागाच्या योजनांचा लाभ देऊ; अब्दुल सत्तार

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची ग्वाही : कन्नड येथे कृषी आढावा बैठकीची सांगता

सकाळ वृत्तसेवा

कन्नड : कृषी विभागाच्या जास्तीत जास्त योजना कन्नड तालुक्यात राबविण्यात येतील, अशी ग्वाही देत शासकीय अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवून जलद गतीने शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्या असे आदेश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी विकास महर्षी शिवाजी आबा बोलधणे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित शेतकरी आढावा बैठकीत (ता.१) दिले.

या बैठकित तालुक्यातील शेती व शेतकरी प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. यावेळी कृषिमंत्री श्री.सत्तार पुढे म्हणाले की, कन्नड तालुका डोंगराळ व दुर्गम आहे. त्यासाठी शासनाचा विशेष विकास निधी आहे. बहुतांश गावे ही गौताळा अभयारण्याला लागून आहे. वन्यजीवांचा उपद्रव या शेतकऱ्यांना भोगावा लागतो. त्यांना वाढीव नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. तसेच इतरही योजना तालुक्यांमध्ये राबवू असेही ते म्हणाले.

यावेळी जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार नितीन पाटील म्हणाले की, कृषिमंत्री सत्तार यांचे कन्नड तालुक्यावर विशेष प्रेम आहे. त्यामुळे जास्तीत जास्त योजना कन्नड तालुक्याला मिळणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी बोलधणे यांनी आपल्या कार्यकाळात बाजार समितीला ऊर्जितावस्था आणल्याचे सांगितले. प्रास्ताविक मेहगावचे सरपंच पांडुरंग घुगे यांनी केले.

याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक डॉ. मनोज राठोड, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार संजय वारकड, मुख्याधिकारी नंदकिशोर भोंबे, तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक, उद्योजक मनोज पवार, शिवसेना तालुकाप्रमुख केतन काजे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला माजी उपनगराध्यक्ष अब्दुल जावेद, आकाश बोलधने, वाल्मीक लोखंडे, मनोज देशमुख, केतन त्रिभुवन, राहुल बोलधने, संदेश पवार, प्रकाश पाटील, आर. आर. काळे जितेंद्र नरवडे, संदीप नरवडे, नितीन राठोड, गोकुळ राठोड, आकाश पाडसवान, सिध्दार्थ निकाळजे, अंकुश बाविस्कर, राहुल राठोड, माजी जिल्हा परिषद सदस्य धनराज बेडवाल, आदींची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger: महाराष्ट्रात पालटू शकतो गेम? आमदार फोडले पण उद्धव ठाकरेंचे खासदार फोडणे शिंदेंसाठी सोपे नाही; Inside Story काय?

Central Railway: कर्मचाऱ्यांचे हाल होणार! मध्य रेल्वेवर 2 दिवस विशेष ब्लॉक, काही लोकल रद्द; वेळापत्रकातही बदल, वाचा सविस्तर

पुण्यात गोळीबाराचा थरार! गुन्हेगाराला पकडायला गेल्यावर अचानक गोळीबार, पोलिसांनीही दिलं प्रत्युत्तर, काय घडलं?

Vaibhav Suryavanshi: वैभव सुर्यवंशीची फटकेबाजी पाहिली का? Video जो गोलंदाजांत धडकी भरवतोय, जबरदस्त विक्रम अन्...

Latest Marathi News Live Update : गडचिरोली पोटनिवडणुकीत भाजपचे अंकुश नैताम विजयी; काँग्रेसला धक्का

SCROLL FOR NEXT