Aurangabad Agriculture Service Center Inspection by Agriculture Department sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : कृषी विभागाकडून कृषी सेवा केंद्राची तपासणी

फुलंब्री दुकानदारांना बजावल्या नोटीस; समाधानकारक उत्तर न मिळाल्यास कारवाई अटळ

नवनाथ इधाटे

फुलंब्री : तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालकांकडून खतांसाठी शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचे वृत्त दैनिक सकाळमध्ये १३ जून रोजी प्रकाशित केले होते. यामुळे खडबडून जागे झालेल्या कृषी विभागाच्या पथकाने मंगळवारपासून तालुक्यात कृषी सेवा केंद्रांची तपासणी हाती घेतली आहे. या पथकाने अनेक दुकानदारांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या असून समाधानकारक उत्तर न आल्यास कारवाई अटळ असल्याचे चित्र आहे.

फुलंब्री तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कृषी सेवा केंद्र आहे. सध्या खरीप हंगामाचे दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी कृषी सेवा केंद्र चालकाकडून बी-बियाणे व रासायनिक खते खरेदी करीत आहेत. तालुक्यात अनेक छोटे-मोठे दुकानदार असून काही शेतकरी केवळ बियाणे खरेदी करीत आहे. तर मोठ्या दुकानदाराकडे बियाणांसह रासायनिक खते उपलब्ध आहे. परंतु काही दुकानदार शेतकऱ्यांची या खरीप हंगामात अडवणूक करीत असून बियाणे ओळखीच्या दुकानातून घेतल्यास दुसऱ्या दुकानात रासायनिक खते घेण्यासाठी गेल्यास रासायनिक खते देण्यास सदरील दुकानदार नकार देत असल्याचे दिसून आले. त्यामुळे ऐन खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांची अडचण निर्माण झाली आहे.

दरम्यान, १३ जून रोजी दैनिक सकाळच्या अंकामध्ये " बियाणे घेतले तरच रासायनिक खते " या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्येला वाचा फोडली होती. सदर वृत्त प्रकाशित होताच जिल्हा कृषी अधीक्षक आणि तालुका कृषी अधिकारी यांच्या पथकाने टाकळी कोलते परिसरात कृषी सेवा केंद्र तपासणी केली आहे. यावेळी काही दुकानदार आपापली दुकाने बंद करून फरार झाल्याचे दिसून आले.

दुसरीकडे फुलंब्री पंचायत समितीचे कृषी अधिकारी एस. आर. मेंमरवाड यांनी फुलंब्री शहरातील कृषी सेवा केंद्र दुकानाची तपासणी केली. यामध्ये अनेक दुकानांमध्ये त्रुटी आढळून आल्याने संबंधित दुकानदारांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. सदरील नोटीसचे सात दिवसात समाधानकारक उत्तर न दिल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

बळिराजाची अडवणूक थांबली

खरीप हंगामामध्ये बी बियाणे व रासायनिक खते खरेदी करताना कृषी सेवा केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात होती. मात्र, सकाळच्या वृत्तानंतर पथकाने केलेल्या कारवाईनंतर शेतकऱ्यांची होणारी अडवणूक थांबली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी दैनिक सकाळचे आभार मानले आहे.

फुलंब्री तालुक्यासह शहरामध्ये कृषी सेवा केंद्र दुकानाची तपासणी केली असता बऱ्याच त्रृटी आढळून आल्या आहे. त्यामुळे संबंधित कृषी सेवा केंद्र चालकांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहे. समाधान कारक उत्तर न आल्यात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

- एस. आर. मामेडवार, कृषी अधिकारी पंचायत समिती फुलंब्री

टाकळी कोलते येथे आलेल्या तक्रारीवरून कृषी सेवा केंद्राची तपासणी केली आहे. काही त्रुटी आढळल्याने नोटीसही देण्यात आली. मात्र दुकान तपासणी करत असताना इतर कृषी सेवा केंद्र चालकांनी दुकाने बंद केल्याने दुकानाला नोटीस डकविण्यात आल्या आहे. सदर नोटीसचे उत्तर सात दिवसात मागविले आहे. समाधानकारक उत्तर न आल्यास कायदेशीर कारवाई होणार.

- भारत कासार, तालुका कृषी अधिकारी फुलंब्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Video: दिवसाढवळ्या 'हॉटेल भाग्यश्री'ची फसवणूक! 'ही' आयडिया करुन लोक पैसे उकळायला लागले अन् फुटक खाऊ लागले

Viral Video: लग्नासाठी मुलगा आहे का? मुलीची अनोखी मागणी, दारुडा हवा नवरा, ५ लाख देणार हुंडा! ही 'डील' मिस करू नका!

Palghar News: महिनाभर 'या' पालघर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाचा अलर्ट; काय आहेत पर्यायी मार्ग?

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

SCROLL FOR NEXT