Aurangabad Ahmedabad old woman Funeral river flood 
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : आमदाबाद येथे वृद्धेला अग्निदाह देताच नदीला आला पूर

मरणाने केली सुटका अन् पुराने छळले!

अरमान मदार

नाचनवेल : आमदाबाद (ता.कन्नड) येथे मंगळवारी (ता.१८) रात्री एका वृद्धेचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यानंतर बुधवारी या महिलेवर स्मशानभूमी नसल्याने अंजना नदीपात्रात अंत्यविधी पार पडला. मात्र, अग्निदाह देताच जोरदार आलेल्या पावसामुळे नदीला पूर आला. यामुळे जोरदार वाहणाऱ्या पाण्यात मृतदेहाची हेळसांड झाली. स्मशानभूमी नसल्याने कुटुंबीयांना अडचणींचा सामना करावा लागला. यामुळे मरणाने केली सुटका अन् पुराने छळले, अशीच काहीशी अवस्था या मृतदेहाची झाली.

शांताबाई गोटीराम बनकर (वय ८२) असे मृत वृद्धेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सदर वृद्धेचे मंगळवारी (ता.१८) रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर बुधवारी (ता.) सकाळी दहाच्या सुमारास येथील अंजना नदीपात्रात अंत्यविधी उरकण्याचे नियोजन सुरू होते. त्यासाठी नदीकाठी ट्रॅक्टरने जागा तयार करून सरणासाठी पुरेशी लाकडे व टायर रचून अग्निदाह देण्यात आला.

मात्र, याचवेळी नदीच्या वरील भागात जोरदार पाऊस झाल्याने नदीला पूर आला. हे लक्षात येताच बनकर कुटुंबातील सदस्यांनी सरण मंदगतीने जळू नये म्हणून विविध उपाययोजना केल्या. मात्र, कुटुंबातील सदस्यांनी पुराच्या पाण्यात अक्षरशः जीव धोक्यात घालून आग विझणार नाही, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

अखेर तळाशी राहिलेले लाकडे जळत असताना पूर अचानक वाढला. त्यामुळे नातेवाइकांची तारांबळ उडाली. अखेर नाही व्हायचे तेच झाले. अग्नी दिलेल्या खालील भागाचे सरण विझून वाहून गेले. येथे स्मशानभूमी असती मृतदेहाची हेळसांड झाली नसती.

दरम्यान, नदीकाठी जुनी स्मशानभूमी असून दोन वर्षांपूर्वी नदीला मोठा पूर आल्याने तेथील नदीकाठचा भाग खचल्याने रस्ता वाहून गेला. त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही. ग्रामपंचायतीने जुन्या स्मशानभूमीसाठी नवीन रस्ता व संरक्षक भिंत करून द्यावी, अशी मागणी सर्व गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. याआधी गावची समस्या लोकप्रतिनिधी मांडताच आ.उदयसिंग राजपूत यांनी नवीन स्मशानभूमीसाठी पाच लाखांचा निधी मंजूर केला आहे. परंतु जागेअभावी हे काम रखडलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivaji Maharaj Video: शिवरायांनी अफजल खानाचा वध कसा केला? महाराजांचे भक्त असाल तर फक्त 7 मिनिटे वेळ काढा, थरारक AI व्हिडिओ व्हायरल

Pune Crime News : “मुळशीत पाय ठेवलास तर ‘मुळशी पॅटर्न’ करेन”; व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी

तू भाई अपना काम कर...! Steve Smith सोबत 'राड्या'चा किस्सा रोहित शर्माने मजेशीर अंदाजात सांगितला; ०.४९ सेकंदाचा भन्नाट Video

Credit Card : ₹3,000 पर्यंत कॅशबॅक; झिरो जॉइनिंग फी; UPI पेमेंट्सवरही फायदा! जाणून घ्या या नव्या क्रेडिट कार्डच्या खास ऑफर्स

Shani Dosha: शनि दोष कमी होईल; फक्त हनुमान मंदिरात गेल्यावर ही गोष्ट लक्षात ठेवा!

SCROLL FOR NEXT