aurangabad aurangabad
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादच्या विमानतळ विस्तारीकरणाच्या हालचाली गतिमान

औरंगाबाद अंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तारीकरणासाठी लागणाऱ्या जामीनीची शुक्रवारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पाहणी केली

प्रकाश बनकर

औरंगाबाद: चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार करण्याचे काम विविध कारणांनी प्रलंबित राहिले होते. मात्र, आता पुन्हा विस्तारीकरणासाठीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यासाठी १८२ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. शुक्रवारी (ता.१८) विस्तारीकरणासाठी लागणाऱ्या जागेची जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पाहणी केली.

जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी चिकलठाणा, मूर्तिजापूर, मुकुंदवाडी या ठिकाणी असलेल्या जागेची पाहणी केली. औरंगाबाद विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी १८२ हेक्टर जमीन प्रस्तावित आहे. भूसंपादन प्रक्रियेसाठी मोजणी व सर्वेक्षण सुरू असून भारतीय विमान प्राधिकरणाच्या औरंगाबाद कार्यकक्षेतील जमिनीवरील अतिक्रमणाबाबतही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी आढावा घेतला. गावठाण व शहर हद्दीत असलेल्या जमिनीच्या संपादनाबाबत भूसंपादन अधिकारी तसेच सिटी सर्वेच्या अधिकाऱ्यांना यावेळी निर्देशित केले. त्याचप्रमाणे प्रकाश नगर, मूर्तिजापूर, कामगार कॉलनी, चिकलठाणा येथील रहिवासी नागरिकांशी संवाद साधत त्यांना घराच्या सुविधेबाबतही जिल्हाधिकारी यांनी आश्वासित केले.

विमानतळ विस्तारीकरणात आवश्यक असलेल्या व मोजणी झालेल्या जमिनीवर योग्य ते मार्किंग करून खांब अथवा खुणा दिसतील अशा रंगात आणि सदरील जमीन विमानतळ प्राधिकरणाची आहे, अशा संदेशाचा फलक दर्शनी भागात लावण्याबाबत विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्या. भेटीदरम्यान विमानतळ प्राधिकरणाचे श्री. साळवे यांनी औरंगाबाद शहरातील विमानतळ तयार झाल्यापासून यामध्ये झालेले बदल व पार्श्वभूमी या विषयी माहिती दिली. तसेच तांत्रिक पथकाने विमानतळाच्या नकाशाप्रमाणे कोणकोणत्या बाबी प्रस्तावित आहे याबाबत जिल्हाधिकारी यांना माहिती दिली.

यावेळी उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, औरंगाबाद विमानतळ प्राधिकरणाचे संचालक डी.जी.साळवे, सहायक महाप्रबंधक सुधीर जगदाळे, प्रभारी उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, नगर भूमापन अधिकारी जी.आर.सोनार, विमानतळ प्राधिकरणाचे कनिष्ठ तांत्रिक अभियंता अमित सिंग, रितेश रमन तसेच मोजणीदार संतोष मस्के उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime: ५ कोटींच्या सोन्याची तस्करी, भाजप नेत्यासह ७ जण पोलिसांच्या जाळ्यात अडकले; मुंबई विमानतळावर मोठी कारवाई

Police Adhikshak Tushar Patil Death : अपर पोलिस अधीक्षक तुषार पाटील यांचे निधन; वयाच्या ४५ व्या वर्षी प्राणज्योज मालवली

Abhijeet Dipke: भाजप-IT सेल भारतीय, बाकी पाकिस्तानी? हिंदू-मुस्लिम करून नोकऱ्या मिळत नाहीत; अभिजित दिपकेंची सरकारवर टीका

India-Nepal Dispute: सीमा वादावर नेपाळचा मवाळ सूर! भारताविरोधात संघर्ष नव्हे, संवाद हवा, परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान

IND vs AFG Test, 2nd Day: भारताच्या साडेपाचशे धावा अन् अफगाणिस्तानचा अर्धा संघ तंबूत; पदार्पणवीर मानव सुतार चमकला

SCROLL FOR NEXT