Aurangabad Attempted suicide as administration was not paying attention 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : प्रशासन दखल घेत नसल्याने केला आत्महत्येचा प्रयत्न

जिल्हाधिकारी कार्यालयापुढे झाडावर टाकला होता फास

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शेजाऱ्यांनी केलेल्या मारहाणीची दखल पोलिस प्रशासन घेत नसल्याने फुलंब्री येथील कुटुंबाने शनिवारी (ता.पाच) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला. यासाठी या कार्यालयाच्या झाडावर गळफास घेण्यासाठी दोरही टाकला होता. दरम्यान पोलिसांनी कुटुंबाची समजूत काढून तक्रार देण्यासाठी फुलंब्री पोलिस ठाण्यात पोलिसांच्या वाहनाने पाठवण्यात आले.

याबाबातच्या निवेदनात फुलंब्री येथे विठ्ठल रखुमाई मंदिरामागे राहणाऱ्या शोभा राजू बिरसने यांनी म्हटले आहे की, आम्ही भाड्याच्या घरात राहतो. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रात्री मुलांनी दारात फटाके वाजवले व गाणे गात असताना शेजारी राहणाऱ्या लोकांनी विरोध करून आम्हाला शिवीगाळ केली. त्यानंतर लोकांचा समूह त्या ठिकाणी जमा झाला असता, मी घाबरून पोलीस ठाणे फुलंब्री यांना फोन करून संपर्क साधला व माहिती दिली. मात्र पोलीस प्रशासनाने कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली नाही. तसेच जमलेल्या काही लोकांनी मला व माझ्या पतीला मारहाण करून दोघांचे कपडे फाडले असा आरोप शोभा बिरसने यांनी निवेदनात केला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयापुढे हे कुटूंब आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी व सिटी चौक पोलिस ठाणे यांना देण्यात आली. सिटी चौक पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी त्या कुटूंबाची भेट घेऊन समजूत काढली. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देऊन तक्रार नोंदण्यासाठी अर्जदार शोभा राजू बिरसने व त्यांच्या कुटूंबियांना पोलिस वाहनात बसवून फुलंब्री पोलीस ठाण्याकडे रवाना करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT