Aurangabad Bank Privatization sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : महाराष्ट्र बँकेच्या प्रगतीसाठी दोन बॅंकांचे विलिनीकरण

डॉ. भागवत कराड : बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स ऑर्गनायझेशनचे अधिवेशन

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : देशभरात सार्वजनिक बँकांचे खासगीकरण करण्यात येत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ज्या दोन सार्वजनिक बँकांच्या खासगीकरणाचा विषय मांडला होता, त्या बँकांचे खासगीकरण सध्या थांबविण्यात आले असल्याचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सांगितले. महाराष्ट्र बँकेच्या प्रगतीसाठी विदर्भ-कोकण आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे विलिनीकरण करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही डॉ. कराड यांनी सांगितले.

बॅंक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स ऑगनायझेशनच्या(बामो) विसाव्या दोन दिवसीय राष्ट्रीय त्रैवार्षिक अभिवेशनाचे उद्घाटन शनिवारी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते हॉटेल अतिथी येथे झाले. यावेळी डॉ. कराड बोलत होते. महाराष्ट्र बँकेचे कार्यकारी संचालक आशिष पांडे, भारतीय मजदूर संघाचे प्रभारी गिरीश आर्या, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब फडणवीस, संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुनील देशपांडे, कार्याध्यक्ष विराज टिकेकर, अश्विनी देव, सरचिटणीस संतोष गदादे यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. कराड म्हणाले, की देशात १२ बँकांत महाराष्ट्र बँक शेवटून दुसऱ्या क्रमांकावर होती. त्यामुळे या बँकेला वर आणण्यासाठी होईल तेवढी मदत केली. आता बँक तिसऱ्या क्रमांकावर आली आहे. मात्र यातही आणखी प्रगती करण्यासाठी दोन बॅंकाचे विलनीकरण करणार आहे. विराज टिकेकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सुनील देशपांडे यांनी अधिकाऱ्यांच्या ५ हजार ५०० जागा तातडीने भराव्यात, अशी मागणी केली. सूत्रसंचालन आदिती वेलणकर, ऋतू विश्वकर्मा यांनी तर आभार अश्विनी देव यांनी मानले. या अधिवेशनात उद्या कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर विविध विषयावर चर्चा होणार असून सायंकाळी समारोप होणार आहे. अधिवेशनास देशभरातील सुमारे ६०० अधिकारी उपस्थित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT