BJP Shivsena Sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादमध्ये बॅनर वॉर; भाजपच्या मोर्चाचे बॅनर अज्ञातांनी फाडले

औरंगाबादमध्ये भाजपाने जल आक्रोश आंदोलन सुरू केलं असून या मोर्चाचे बॅनर अज्ञातांकडून फाडण्यात आले आहेत.

दत्ता लवांडे

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये भाजपाकडून जलआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. आज हा मोर्चा होणार होता पण त्यापूर्वीच भाजपाच्या मोर्चाचे बॅनर फाडण्यात आले आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा होणार असून या मोर्चामध्ये भाजपचे रावसाहेब दानवे आणि भागवत कराड हेही सहभागी होणार आहेत.

औरंगाबादमधील पैठण गेट ते महानगरपालिका कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढला जाणार आहे. औरंगाबाद शहराच्या पाणी प्रश्नाबाबत हा मोर्चा भाजपाकडून काढण्यात येत आहे. दरम्यान याआधी पडेगाव परिसरात भाजपाचे बॅनर फाडण्यात आले आहेत.

औरंगाबादमधील पैठण गेट परिसरात भाजपाने आपल्या मोर्चाचे बॅनर लावले होते. त्याशेजारीच शिवसेनेने आपले बॅनर लावल्याने या दोन पक्षात बॅनर वॉर आपल्याला पाहायला मिळालं. दरम्यान पडेगाव परिसरात अज्ञातांनी भाजपाच्या मोर्चाचे बॅनर फाडले होते. त्यानंतर काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

दरम्यान भाजपाने आपल्या मोर्चाच्या बॅनरमध्ये महाविकास आघाडीला राक्षस असं संबोधलं आहे. आज दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास हा मोर्चा सुरू होणार असून सायंकाळी सात वाजेच्या सुमारास हा मोर्चा महानगरपालिका कार्यालयापर्यंत पोहोचेल. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस या मोर्चाचे प्रमुख असून रावसाहेब दानवे, भागवत कराड हेसुद्धा यामध्ये सहभागी असणार आहेत.

औरंगाबादमध्ये आठवड्यातील फक्त एक दिवस पाणी येत असल्याने नागरिकांना पाण्याच्या प्रश्नाला सामोरं जावं लागत आहे. औरंगाबादकरांसाठी १६०० कोटी रूपयांची पाणी योजना सरकारने सत्तेच्या शेवटी दिली असल्याचा आरोप शिवसेना भाजपावर करत आहे. त्यामुळे शिवसेना - भाजपा वाद शिगेला पोहोचला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावाची फक्त 'हवा'! बलाढ्य पोर्तुगालला ५२ वर्षांनी वर्ल्ड कप खेळणाऱ्या काँगोने रडवले, धक्कादायक निकाल

T20 WC: धक्कादायक! भारताच्या प्रमुख खेळाडूला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले... सर्व खेळाडू तिच्याभवती जमले, चिंता वाढवणारी घटना

Monsoon Tourism: पावसाने दडी मारताच ताम्हिणी घाट-देवकुंड पर्यटन ठप्प; अंधारबन, खजिना ट्रेकवर शुकशुकाट

Donald Trump: ''नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत भारतावर हल्ला झाला तर..'', डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान अन् जगभरातील नेत्यांच्या भूवया उंचावल्या

‘बी-२’चा ‘जीआर’ महिनाभरात! सोलापुरातील १२५ वर्षे जुन्या चाळींमधील प्रत्येक कुटुंबास मिळणार काही हजारांत जागेची मालकी; आमदार देवेंद्र कोठेंचा यशस्वी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT