Abdul Sattar Sakal
छत्रपती संभाजीनगर

शिंदे गटातील मंत्री सत्तारांच्या अडचणी संपेना; कोर्टाने बाजवली नोटीस

या प्रकरणात अब्दुल सत्तार यांनी कोणतेही हस्तक्षेप करू नये असे आदेश कोर्टाने दिले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Abddul Sattra News : बंडखोरी करून सत्तेत आलेल्या शिंदे गटाच्या आणि त्यांच्या गटातील मंत्री अब्दुल सत्तारांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसून येत नाहीये. शिंदे गटातील कृषीमंत्री असलेले सत्तार यांनी औरंगाहबाद खंडपीठाने नोटीस बजावली आहे. या प्रकरणात अब्दुल सत्तार यांनी कोणतेही हस्तक्षेप करू नये असे आदेश कोर्टाने दिले आहे.

बाजार समितीच्या जागेचे व्यवहार प्रकरणावर न्यायालयाने व्यवहार करण्यास मान्यता दिली होती. मात्र, त्यानंतरही तत्कालीन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी एका अर्जावर या व्यवहाराला स्थगिती दिली होती. या प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. एवढेच नव्हे बाजार समितीच्या संचालक मंडळावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश सत्तारांनी दिले होते.

औरंगाबाद खंडपीठाने तत्कालीन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या निर्देशाने कृउबा समितीच्या जिन्सी येथील जागेबाबत झालेल्या व्यवहाराच्या चौकशीच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. सत्तार यांच्यासह डॉ. दिलावर बेग यांनाही नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहे. तसेच औरंगाबाद बाजार समितीच्या जिन्सी येथील जागेच्या व्यवहारांबाबत विद्यमान कृषी आणि तत्कालीन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तारांकडे किती तक्रार अर्ज केले, याची चौकशी करून त्यासंबंधी सीलबंद अहवाल दाखल करण्याचे आदेशही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Update: MPSC चा मोठा निर्णय! 11 हजार जागांची वाढ; तलाठ्यांच्या किती जागा? परीक्षा कधी? नव्याने अर्ज कधी करता येणार?

Solapur Accident: सोलापूर-पुणे महामार्गावर काळाचा घाला! कंटेनरला कारची धडक; आजी-आजोबा, सून अन् नातवाचा मृत्यू

Nashik Road Accident: रस्त्याचे काम सुरू असताना सुरक्षेकडे दुर्लक्ष; खोल खड्ड्यात ट्रॅक्टर पलटी, १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Pune Crime: ओतूर पोलिसांचा दुचाकी चोरट्यांना दणका! तीन आरोपी अटकेत; पाच लाखांच्या नऊ मोटारसायकली जप्त

Beed Crime: फेसबुकवरील साड्यांच्या जाहिरातीचा सायबर सापळा; ८.६४ लाखांची फसवणूक, दोन लाख रुपये होल्ड

SCROLL FOR NEXT