covid 19 impact on pregnancy 
छत्रपती संभाजीनगर

कोरोनाचा गर्भवती महिला आणि बाळाच्या आरोग्यावर परिणाम होतो का?

सकाळ ऑनलाईन टीम

औरंगाबाद: मागील एक वर्षापासून जगभरासह देशात कोरोनाने कहर केला आहे. लाखो लोकांना या रोगामुळे जीव गमवावा लागला आहे. सध्या भारतातही कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. कोरोनाने लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत कुणालाच सोडलं नाही. आता अशात गर्भवती महिलांच्या आरोग्यावर किंवा होणाऱ्या बाळावर कोरोनाचा परिणाम होतो का, झाला तर नेमका काय होतो हे जाणून घेऊया.

काही दिवसांपुर्वी झालेल्या एका संशोधनात असं समोर आलं आहे की, कोरोनाची बाधा झालेल्या महिलेला प्रेग्नंसीवेळी अडचणी वाढू शकतात.

हे संशोधम कॅनेडियन मेडिकल असोसिएशन जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला होते. या अभ्यासात आईवर कोरोना संसर्गामुळे उद्भवणार्‍या जोखमींवर लक्ष केंद्रित केले होते. तसेच याचा बाळावरही मोठा परिणाम होतो. हे परिणाम प्रीक्लेम्पसिया (preeclampsia),गर्भ दगावणे, मुदतीपूर्व जन्म आणि इतर प्रतिकूल परिणामांशी संबंधित असू शकतात असंही या संशोधनात समोर आलं आहे.

संशोधनात अजून काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. यात असंही आढळलं आहे की, कोरोनाचा संसर्ग झाल्यास प्रेग्नंसीदरम्यानची जोखीम दुप्पट होते. तसेच गर्भवती महिलेमध्ये सिझेरियन पध्दतीने प्रसूती होण्याच्या धोक्यात 50 टक्क्यांनी वाढ होते.

कॅनडाच्या मॉन्ट्रियल युनिव्हर्सिटीच्या संशोधक नॅथली ऑगर यांनी सांगितले की, " आम्हाला संशोधनात कोरोनाबाधित प्रेग्नंट महिलेच्या रक्तदाबावरही परिणाम होत असल्याचे दिसले आहे. तसेच प्रेग्नंसीनंतर बाळाची काळजीही खूप घ्यावी लागते. एकंदरीत कोरोमुळे बराच गुंता वाढत जातो" 

या संशोधनासाठी, संशोधकांनी 42 अभ्यासांचा आढावा घेतला आणि यामध्ये जवळपास 438 प्रेग्नंट महिलांचा समावेश होता. या प्रेग्नंट महिला कोरोनाबाधित असल्याने त्यांच्यावर अभ्यास केला. या आकडेवारीतून असे दिसून आले आहे की, संसर्ग झालेल्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण आणि मुदतीपूर्वी जन्माचा धोका जास्त असल्याचे दिसून आले.

या अभ्यासात प्रेग्नंट महिलांच्या शरीरातील रक्तप्रवाहादेखील अडचणी येत असल्याचे समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT