Take care of the childerns who are becoming super spreader of corona virus 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादकरांनो मुलांची काळजी घ्या! २६ बालके कोरोनाबाधित

गेल्या दीड महिन्यात शून्य ते पाच वयोगटातील ४६५ बालके बाधित निघाली तर पाच ते अठरा वयोगटातील २,४१५ बालकांना कोरोनाची बाधा झाली आहेत.

माधव इतबारे

औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या (Corona Infection) तिसऱ्या लाटेत बालकांना अधिक धोका असल्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कोरोनाबाधित बालकांना (Corona Positive Children In Aurangabad) विशेष लक्ष दिले जात आहे. सोमवारी (ता.११) एकाच दिवसात शून्य ते १८ वर्षे वयोगटातील ३१ जण कोरोनाबाधित झाल्याचे महापालिकेच्या (Aurangabad) अहवालातून समोर आले होते. दरम्यान, मंगळवारी (ता.१२) शहराच्या विविध भागातून २६ बालकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने बालकांसाठी २०० खाटांचे विशेष रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. (Aurangabad Breaking News 26 Children Tests Covid Positive)

त्यात एमजीएम स्पोर्ट कॉम्प्लेक्स येथे १००, तर गरवारे कंपनीच्या परिसरात सुरू होणारे ऑक्सिजन बेडचे १०० खाटांचे रुग्णालय बालकांसाठीच राहणार आहे. दरम्यान, गेल्या दीड महिन्यातील आकडेवारी पाहता कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेतही कोरोनाबाधित बालकांची संख्या अधिक दिसून येत आहे. महापालिकेच्या म्हणण्यानुसार शून्य ते १८ वर्षे वयोगटातील सर्वजण बालक संवर्गात आहेत. त्यानुसार, गेल्या दीड महिन्यात शून्य ते पाच वयोगटातील ४६५ बालके बाधित निघाली तर पाच ते अठरा वयोगटातील २,४१५ बालकांना कोरोनाची बाधा झाली आहेत, असे महापालिकेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT