Astik Kumar Pandey 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय कोरोना पाॅझिटिव्ह

माधव इतबारे

औरंगाबाद : महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय हे देखील कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यांना काल शनिवारी काहीसा त्रास जाणवू लागल्याने त्यांनी आरटीपीसीआर चाचणीसाठी स्वॅब दिला होता. त्यांचा आज सकाळी अहवाल पॉझिटिव्ह आला. यापूर्वी, मागील पंधरा दिवसांत औरंगाबाद पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे हे प्रमुख अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने त्याचा परिणाम पालिकेच्या प्रशासकीय कामावर झाला आहे.

मात्र आयुक्त पांडेय आता हेच कोरोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे पालिकेचे कामकाज आणखी ढेपाळते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, पांडेय होम आयसोलेट होण्याच्या तयारीत असल्याचे सूञांनी सांगितले. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राठोडकर यांनी सांगितले की, आयुक्त पांडेय यांना काल ताप आल्याचे जाणवले. त्यामुळे त्यांनी लगेच आरटीपीसीआरसाठी स्वँब दिला. त्यांचा अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आला. माञ त्यांच्यात नॉर्मल सिम्टम्स् जाणवले आहेत. काळजी करण्यासारखे काही नाही. दरम्यान आयुक्त पांडेय यांनी त्यांच्या संपर्कातील सर्वांना कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केल्याचे सूञांनी सांगितले.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PUNE GANPATI VISARJAN PARKING 2026: पुणेकरांनो! गणपती विसर्जनासाठी घराबाहेर पडताय? मग 'ही' पार्किंग स्पॉट्सची यादी लगेच पाहा

अजय देवगणच्या अडचणीत वाढ? मुंबईतील जुहू बंगल्यावर BMC कारवाई, पण नक्की कारण काय?

Nagpur Ganesh Visarjan: ड्रोनमधून ठेवणार गणेश विसर्जनावर नजर;६, हजार ४०० पोलिसांचा बंदोबस्त; १ हजार ७०२ सार्वजनिक गणेश मंडळांचा समावेश

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट; अहेरी दक्षिण भागात मुसळधार पावसाची सुरुवात

बेलापूरमध्ये पारसिक हिलवरून थेट रुळावर कोसळली कार, १७ वर्षीय तरुण गंभीर जखमी; हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत

SCROLL FOR NEXT