break the chain in Aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

बाजारपेठा - दुकाने बंद, मग नागरिक कशासाठी घराबाहेर पडतात?

सुनिल इंगळे

औरंगाबाद : शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढतो आहे, हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  शासनाच्या वतीने 'ब्रेक द चेन' अंतर्गत शहरातील बाजारपेठ, दुकाने, कपडा मार्केट बंद ठेवले आहे.  शहरात जीवनावश्यक वस्तू सोडून सर्व गोष्टी बंद ठेवले असताना नागरिक कारण नसतानाही मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर फिरताना दिसत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन रोज नव नवीन नियम व निर्बंध लावत आहे.

एकीकडे व्यापारी व नागरिकांकडून कडक लॉकडाऊनला विरोध करण्यात येत आहे. हा विरोध लक्षात घेता प्रशासनाच्या वतीने नियम शिथिल करत काही गोष्टींना परवानगी दिली आहे. अशा परिस्थितीत पोटाला गाठ मारत रोजंदारीवर काम करणारे व छोटे-मोठे व्यापारी, दुकानदार शासनाचे नियम पाळत आपली दुकानं बंद ठेवली आहेत. परंतु दुकाने बाजारपेठ बंद असताना नागरिक बेफिकीरपणे बाहेर फिरत आहेत.

काही नागरिकांना विचारले असता तुम्ही बाहेर कशासाठी पडले तर ते म्हणाले, दारावर भाजीपाला येत नाही म्हणून भाजीपाला घेण्यासाठी बाहेर पडलो, तर एका तरुणाला विचारले तर तो म्हणाला मित्राच्या घरी चाललो, असे बाहेर पडलेल्या नागरिकांनी उत्तरे दिली. नागरिकांच्या या बेफिक्रीमुळे कोरोना फोफावत आहे.

नागरिकांनो कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व कोरोनाशी रुग्णालयात झुंज देणारे व्यक्ती व परिवार किती भयंकर परिस्थितीत जातात आहेत, याचे गंभीर लक्षात घ्या. तुमच्या आजूबाजूलाही असे अनेक प्रकरण घडले असतील, यामुळे हा प्रकार आपल्या परिवाराबाबतीतही घडू शकतो. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत  नागरिकांनो कोरोनाचे नियम पाळा आणि गरज असेल तरच बाहेर पडा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT