pachod flag news 
छत्रपती संभाजीनगर

तंटामुक्त पारितोषिक मिळविणाऱ्या गावांत झेंड्यावरून तंटा

हबीबखान पठाण

पाचोड(औरंगाबाद): सन २०१२ साली  तंटामुक्त अभियानात सहभाग घेऊन दोन लाखाचे तर ग्राम स्वच्छता अभियानाचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. कलाम यांच्या हस्ते सन २००५ पारितोषिक मिळविणाऱ्या गावाच्या शांतता व एकात्मतेला काही समाजकंटकाने गालबोट लावला. तंटामुक्त गावच आता तंटायुक्त होऊन गावातील शांतता व एकात्मतेला सुरूंग लागला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे कामी दोन दिवसापासून महसुल व पोलीस प्रशासनाच्या दमछाक नंतर रविवारी (ता.२८) सायंकाळी या वर तोडगा निघून गावांतील वाद निवळला.

हर्षी (बु) हे दोन ते अडिच हजार लोकसंख्येचे गाव. या गावाने सर्वप्रथम सन २००५ मध्ये जिल्हास्तरीय ग्रामस्वच्छता अभियानाचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.कलाम यांच्या हस्ते पारितोषीक मिळविले. तर सन २०१२ मध्ये तंटामुक्त अभियानात भाग घेऊन दोन  लाख रुपयांचे तंटामुक्तीचे पारितोषिक मिळविले होते. गावात सर्व समाजाचे लोक गुण्या -गोविंदाने राहतात. परंतु काही लोकांनी गावातील काही व्यक्तींना हवा भरली. अन् अचानक शुक्रवारी (ता. २६) रात्रीतून जून्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर काही अज्ञात समाजकंटकाने एका विशिष्ट रंगाचा ध्वज उभा केला.

दिवस उगवताच गावात चर्चा होऊन शनिवारी (ता.२७) मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांना माहिती मिळताच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. तर पैठणचे प्रभारी तहसिलदार दत्तात्रय निलावाड हेही तेथे हजर झाले. महसुल व पोलिस प्रशासनाकडून शांतता बैठक घेऊन गावातील स्नेह, जिव्हाळा, एकात्मता टिकविण्यासाठी समजाविण्यात येऊन ध्वज काढण्याचे ठरले मात्र ध्वज लावणाऱ्यांनी आम्हाला पर्यायी जागा उपलब्ध होईपर्यंत ध्वज काढण्यास विरोध दर्शविला.

सहायक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे यांनी मोठया विश्वासाने कायद्याची नियमावली सांगून यावर तोडगा काढत तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर घायाळ, पोलीस पाटील कल्याणराव आगळे, सरपंचास यांना पर्यायी सुचना करून त्यांचे वर जबाबदारी सोपविली. त्याप्रमाणे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर घायाळ, पोलीस पाटील कल्याणराव आगळे , सरपंच व गावातील प्रतिष्ठीतांनी रविवारी ( ता.२८) गावकऱ्यांची बैठक घेत सबंधीत ध्वज लावण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने पर्यायी जागा उपलब्ध करुन देण्याचे मान्य केले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वन डे वर्ल्ड कप २०२७ साठी BCCI ने २० खेळाडू आधीच निवडलेत? IPL 2026 मध्ये त्यांच्यावर निवड समितीचे लक्ष

दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांचा शेवटचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला; 'बेवारस'चं पोस्टर समोर, काय आहे कथा?

Reels पाहून कपल्स पोहोचलं सुप्रीम कोर्टात; वाटलं लग्न होईल, पण घडले भलतंच...

Nashik News : नाशिककरांनो लक्ष द्या! रमजान ईदनिमित्त उद्या वाहतुकीत मोठे बदल; 'या' मार्गांवर असेल प्रवेशबंदी

Ashok Kharat: कोट्यवधींची जमीन, आलिशान बंगला, फार्महाऊस… अशोक खरात १५ वर्षांत कसा बनला २०० कोटींचा मालक? कुंडली आली समोर

SCROLL FOR NEXT