corona testing 
छत्रपती संभाजीनगर

Coronavirus: चाचण्यांसाठी शहरात ५४ पथके; एन्ट्री पॉईंटवर होणार प्रवाशांची तपासणी

माधव इतबारे

औरंगाबाद: शहरातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणासोबत आता जास्तीत जास्त चाचण्या करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. जुन्या पथकांसोबत आता आणखी सहा मोबाइल टीम, सहा कन्टेनमेंट झोन टीम व सिटी एन्ट्री पॉइंटवर सहा पथके तैनात केली जाणार आहेत. एकूण ५४ पथकांमार्फत अधिकाधिक जणांच्या चाचण्या केल्या जाणार असल्याचे महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी बुधवारी (ता. १७) सांगितले.

फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून नागरिकांसोबत संवाद साधताना श्री. पांडेय म्हणाले, की कोरोना संसर्ग वाढल्यानंतर शहरात दहा मोबाइल टीम आणि २४ तपासणी केंद्रांवर चाचणी केली जात आहे. त्यासोबत आणखी सहा मोबाइल टीम, कंटेनमेंट झोनसाठी सहा टीम आणि शहराच्या एन्ट्री पॉइंटवर सहा ठिकाणी सहा टीम अशा एकूण ५४ टीम आता स्वॅब घेतील.

कंन्टेनमेंट झोनबाबत श्री. पांडेय म्हणाले, की गेल्यावर्षीच्या तुलनेत कन्टेनमेंट झोनचे निकष यावेळी बदलले आहेत. आढळून येणारे रुग्ण दाट वस्तीत नाहीत. त्यामुळे आता २० पेक्षा अधिक रूग्ण आढळल्यास वसाहत सील केली जाणार नाही. मात्र, त्या वसाहतीत पोस्टर्स व बॅनर लावले जातील. जेणेकरून नागरिकांना हा भाग कोरोनासाठी रेड झोन असल्याचे कळेल.

या भागातील एका व्यक्‍तीला स्वयंसेवक म्हणून देखरेखीसाठी नियुक्‍त केले जाईल. तसेच आशा स्वयंसेविका, शिक्षक या भागात जाऊन दररोज पाहणी करतील. तसेच चाचण्यांसाठी नोडल ऑफिसर म्हणूनही तेच काम पाहतील. त्यानंतर पाहणी अहवाल ते वॉररूमला देतील.

वीस शहर बस दाखल 
कोरोनाबाधित व्यक्ती स्वतःच्या वाहनाने कोविड केअर सेंटरमध्ये जातात. आता पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या वाहतुकीसाठी व पथकांसाठी २० स्मार्ट बसची व्यवस्था करण्यात आली आहे. या बससोबतच आणखी १० नवीन अ‍ॅम्ब्युलन्स सुरू करणार असल्याचे श्री. पांडेय यांनी सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

SCROLL FOR NEXT