corona condition in Aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

Coronavirus चिंताजनक! औरंगाबादमध्ये कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण घटले

मधुकर कांबळे

औरंगाबाद: फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ९६ टक्क्यांवर होते. हे प्रमाण आता कमी होत आहे. प्राप्त अहवालानुसार सध्या कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण ७७ टक्के आहे. हे प्रमाण घटत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

शहरात फेब्रुवारीच्या मध्यापासून कोरोनाबाधितांची संख्या वाढण्यास सुरवात झाली आहे. गेल्या काही दिवसात तर कोरोनाबाधितांची संख्या रोज एक हजारांच्यावर जात आहे. आठ दिवसांपासून हा आकडा दीड हजारांपर्यंत गेला. वाढत्या रुग्ण संख्येबरोबरच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढणे गरजेचे असताना ते प्रमाण मात्र कमी होताना दिसून येत आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नुकत्याच प्राप्त झालेल्या अहवालानुसार कोरोनामुक्तीचा दर हा ७७ इतका झाला आहे. हा दर वाढण्याची गरज असल्याचे मानले जात आहे. कोरोनाबाधितांची वाढती संख्या व कोरोनामुक्तीचा कमी होणारा दर यामुळे पॉझिटिव्हिटीचा दर ३०.३१ टक्क्यांवर पोहोचला आहे.

महापालिकेच्या माध्यमातून आतापर्यंत १ लाख २२ हजार ५४३ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी ३४ हजार १८३ जणांच्या स्वॅबचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आहेत, तर ८८ हजार ६६ जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. २९४ जणांचे अहवाल येणे बाकी आहे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिवसेना-भाजपमध्ये नाराजी? एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; भाजपची तक्रार करत अमित शहांना मनातील खदखद सांगणार!

Sanju Samson 0.32s Video: संजू सॅमसनचा 'हा' Video का झालाय व्हायरल? लोकेश राहुलने हाक मारली, सुरुवातीला तो पुढे निघून गेला अन्...

Indian Army Agniveer Bharti : भारतीय लष्करात अग्निवीरांसाठी मेगा भरती; ऑनलाईन प्रक्रिया सुरु, घरबसल्या कसा अर्ज करायचा? पाहा

Latest Marathi Update: निमंत्रणावरून उपमहापौर- महापौरांमध्ये नाराजीनाट्य

कोण आहे झी मराठीच्या 'सनई चौघडे' मालिकेत दिसणारी नायिका? ५ वर्षानंतर केलंय पुनरागमन, म्हणते-

SCROLL FOR NEXT