Corona Vaccination Shortage In Soygaon Aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादच्या सोयगाव तालुक्यात कोविड लशीचा साठा संपला, तिसऱ्या टप्प्याचे लसीकरण रखडले

ईश्वर इंगळे

सोयगाव (जि.औरंगाबाद) : कोरोना संसर्गाचे ९४ रुग्णसंख्या प्रगतीपथावर असलेल्या सोयगाव तालुक्याचा कोरोना लसीकरणाचा साठा शुक्रवारी (ता.२६) ड्राय झाल्याने जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग लसीकरणाअभावी कोरडाठाक झाला असल्याने तिसऱ्या टप्प्याचे अंतिम टप्प्यात आलेले लसीकरण रखडले आहे. सोयगाव तालुक्यात आरोग्य विभागाकडून लसीकरण गतिमान करण्यात आले असतांना सोयगाव ग्रामीण रुग्णालयासह जरंडी, बनोटी, फर्दापूर आणि सावळदबारा या पाच केंद्रांवर गतिमान लसीकरण हाती घेण्यात आले होते. यासाठी तालुका आरोग्य विभागाकडून नियोजन करण्यात आले असतांना अचानक सोयगाव तालुक्यातील लसीकरणाचा साठा संपल्याने लसीकरण रखडले असल्याने चिंतेची बाब झाली आहे.

एकीकडे कोरोना संसर्गाचे रुग्णसंख्या वाढती होत असतांना ९४ रुग्ण कोरोनाचं दुसऱ्या लाटेत सोयगाव तालुक्यात प्रगतीपथावर आहे. त्यापैकी पाच ४४ रुग्णांना तातडीने उपचार करून कोरोनमुक्त करण्याची जबाबदारी तालुका आरोग्य विभागाने पूर्ण केली असता. मात्र दुसरीकडे मात्र लसीच्या साठ्याअभावी सोयगाव तालुक्यात अडथळे निर्माण झाले आहे. गतिमान लसीकरणात सोयगाव तालुक्यात तिघेही टप्प्यात तब्बल 3 हजारावर नागरिकांना पाचही केंद्रांवर लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. मात्र अचानक साठा संपल्याने मोठी अडचण निर्माण झालेली आहे.

‘घाटी’च्या फोटोवरुन ट्रोलींगवॉर! व्हायरल फोटोमुळे टिकेचीही झोड

फर्दापूरला नव्याने केंद्र
सोयगाव ग्रामीण रुग्णालयासह चार लसीकरण केंद्रे असतांना प्रक्रिया गतिमान करण्यासाठी तहसीलदार प्रवीण पांडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास सोनवणे यांच्या कल्पकतेतून नव्याने फर्दापूर गावाला लसीकरण कार्यान्वित करण्यात आले. मात्र अचानक साठा संपल्याने पाचही केंद्रांवर लसीकरण ठप्प झाले आहे.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT