Aurangabad crime news
Aurangabad crime news 
छत्रपती संभाजीनगर

धक्कादायक! अडीच महिन्यांपासून बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला कुजलेल्या अवस्थेत

migrator

पिशोर (जि.औरंगाबाद): अडीच महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचे प्रेत कुजलेल्या व झाडाला लटकलेल्या अवस्थेत कन्नड जवळील चंदन नाल्याजवळ आढळून आले. भगवान प्रभाकर पवार (वय 23 रा. खातखेडा ता.कन्नड) असे तरुणाचे नाव आहे. हा तरुण मागील अडीच महिन्यांपासून बेपत्ता होता.

या विषयी अधिक माहिती अशी की, मंगळवारी (ता.13) काही मुले संध्याकाळी साडेपाच वाजता कन्नड-पिशोर रस्त्यावरील चंदन नाल्याजवळ करवंद गोळा करण्यासाठी जवळपास 500 मीटर आत डोंगरावर गेले होते. सागाच्या एका झाडाला दोरीच्या साहाय्याने लटकलेला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह त्यांना नजरेस पडला. या मुलांनी तात्काळ ही माहिती कन्नड पोलिसांना दिली.

पोलिस उपनिरीक्षक जाधव, पोलिस उपनिरीक्षक राऊत, हेड कॉन्स्टेबल अहिरे, पो. ना. बर्डे, पो. ना. सुरवाडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास केला. तपासात घटनास्थळी एका बॅगमध्ये आधार कार्ड व इतर काही साहित्य आढळून आले. आधार कार्ड वरील नोंदीवरून हा मृतदेह भगवान प्रभाकर पवार याचा असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी खातखेडा येथे संपर्क साधला असता हा तरुण 25 जानेवारीला कन्नडला गाडीवर कामाला जातो असे सांगून गेला होता. परंतु 30 जानेवारी पर्यंत घरी आला नाही, कामावर गेलेला नव्हता आणि त्याचा मोबाईल सुद्धा बंद असल्याने त्याचे वडील प्रभाकर संपत पवार यांनी पिशोर पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याबाबत तक्रार दाखल केलेली होती अशी माहिती प्राप्त झाली.

मंगळवारी अचानक बेपत्ता तरुणाचा मृतदेह दोरीच्या साहाय्याने लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे या तरुणाच्या घरच्यांना धक्का बसला. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याने जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. कन्नड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

(edited by- pramod sarawale)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अर्धशतकवीर पोरेलपाठोपाठ ऋषभ पंतही झाला बाद, दिल्लीचा निम्मा संघ परतला माघारी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT