crime in Aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

खळबळजनक! बँकेच्या परीक्षेला आलेल्या तरुणाची भोसकून हत्या; हात छाटला

सुषेन जाधव

औरंगाबाद: बॅंकेची परिक्षा देण्यासाठी आलेल्या तरुणाची भोसकून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी (ता.९) सकाळी उघडकीस आली. विकास देवीचंद चव्हाण (२३, रा. पाथर्डी, जि. नगर) असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. विकास याचा एक हात पूर्णपणे छाटण्यात आला असून त्याच्या अंगावर भोसकल्याच्या खुना आहेत. महापालिका मुख्यालयाजवळील कब्रस्तानमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला होता.

शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता मुस्लिम बांधव कब्रस्तानमध्ये गेल्यानंतर हा प्रकार समोर आला. दरम्यान सिटी चौक पोलिस ठाण्याला माहिती देण्यात आल्यानंतर निरीक्षक संभाजी पवार यांनी कर्मचाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान विकासचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची पाहणी केली असता त्याच्या अंगावर भोसकल्याच्या जखमा आढळून आल्या, तसेच त्याचा एक हात छाटल्याचे दिसून आले.

मात्र छाटलेला हात घटनास्थळी आढळला नाही. घटनास्थळी पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, सहायक आयुक्त हनुमंत भापकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव आदिंनी भेट दिली. यावेळी न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे अधिकारी, श्‍वान पथक पाचारण करण्यात आले होते. श्‍वानाला कब्रस्तानाच्या दुसऱ्या दरवाजाजवळ एक बॅग आढळून आली, त्यामध्ये मृत विकासचे परिक्षा प्रवेशपत्र, इतर कागदपत्रे आढळून आली.

दरम्यान विकासच्या नातेवाईकांशी संपर्क करुन त्यांना माहिती देण्यात आली असून नातेवाईक औरंगाबादला येत असल्याची माहिती निरीक्षक संभाजी पवार यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

रात्रीच्या संचारबंदीवर प्रश्‍नचिन्ह-
एकीकडे रात्रीची संचारबंदी असताना असे प्रकार घडल्याने पोलिसांची कार्यतत्परता, संचारबंदीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहेत. विकासचा खुन कशामुळे, कोणी केला याबाबत अद्याप ठोस माहिती समोर आली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mirza Fakhrul Alamgir: बांगलादेशमध्ये मोठी राजकीय उलथापालथ! BNPचे मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर नवे राष्ट्रपती, किती मतं मिळाली?

Virender Sehwag Son: जसा बाप, तसा बेटा! आर्यवीरचा शॉट पाहून चाहत्यांना झाली विरेंद्र सेहवागची आठवण, Video Viral

DJ वाल्यांनो लक्ष द्या! बेस-टॉपला हिरवा कंदील, ‘प्रेशर मिड’वर पोलिसांची नजर; पुण्यात गणेशोत्सवातील DJसाठी लवकरच नियमावली

Nalasopara Accident: भरधाव गाडीचा थरार; १६ वर्षांच्या मुलाने दोन महिलांना चिरडलं, एकीचा मृत्यू, एक गंभीर

ZP Schools Crisis: ‘मंत्र्यांच्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत शिकू द्या’; अभिजित दिपके यांचा औसा तालुक्यातील शाळांच्या दुरवस्थेवर सरकारला जाब

SCROLL FOR NEXT