Weekly Market At Takali Rajeray Aurangabad  
छत्रपती संभाजीनगर

कोरोनाचे नियम मोडून औरंगाबादच्या टाकळी राजेरायमध्ये भरला आठवडे बाजार, स्थानिक प्रशासन झोपेतच

आरेफ पटेल

टाकळी राजेराय (जि.औरंगाबाद) : गेल्या काही दिवसांपासुन कोरोनाचा पुन्हा वाढत असलेला धोका, प्रशासन करत असलेले नियोजन, कडक करत असलेले नियम डावलुन खुलताबाद तालुक्यातील टाकळी राजेराय येथे गुरुवारी (ता.१८) जागा बदलुन आठवडे बाजार भरवण्यात आला आहे. विशेष म्हणजे गर्दी होत असताना देखील स्थानिक प्रशासन गप्प का होते? हा मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


आता शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असताना प्रशासनाने सर्व बाजार बंद केले आहे. परंतु टाकळी राजेराय येथे भरलेला आठवडे बाजार स्थानिक पदाधिकारी प्रशासनाच्या उपाययोजनेला किती महत्त्व देत आहे हे स्पष्ट होत आहे. येथील नेहमी ग्रामपंचायतीजवळ भरणारा आठवडे बाजार आज  जागा बदलुन जुने बसस्थानक परिसरात भरवण्यात आले होते.

या ठिकाणी गावातील शेतकऱ्यांसह परिसरातील शेतकरी व्यापाऱ्यांनी आपली दुकाने थाटली होती. यावेळी मोजकेच नागरीक वगळता कोणीच मास्क लावले नव्हते. तसेच कोणत्याही प्रकारचे शारीरिक अंतर पाळण्यात आले नाही. तसेच स्थानिक प्रशासनाकडुनही कोणतीच काळजी घेण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचे किती गांभीर्य स्थानिक प्रशासन आणि नागरिकांना आहे, हे स्पष्ट झाले आहै. आता वरिष्ठ यावर काय निर्णय घेतील ते पाहणे महत्त्वाचे राहणार आहे.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT