Aurangabad Lock Down Updates ST Bus Service Continue 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादकरांना दिलासा! प्रवाशांच्या सेवेसाठी लॉकडाऊनच्या काळातही एसटी राहणार सुरुच

अनिल जमधडे

औरंगाबाद : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हयाभरात ११ मार्च ते ०४ एप्रिल या दरम्यानच्या काळात अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात येत आहे. तसेच शनिवार आणि रविवारी कडक स्वरूपात लॉकलाडऊन करण्यात येणार आहे. असे असले तरी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी सुरूच राहणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक अरूण सिया यांनी दिली.


जिल्हयाभरात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढच आहे. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने ११ मार्च ते ४ एप्रिल दरम्याने अंशतः लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या दरम्यानच्या काळात प्रत्येक शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन राहणार आहे. या लॉकडाऊनच्या काळात राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) बससेवा सुरूच राहणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये. यासाठी या पूर्वीच एसटीच्या अधिकाऱ्यांसह चालक, वाहक आणि प्रवाशांना कोरोनाचे नियम काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक प्रवाशांनी मास्क वापरणे अत्यावश्यक आहे. या शिवाय शासनाने घालून दिलेल्या नियम आणि अटीचे सुध्दा पालन करावे, असे आवाहन ही सिया यांनी प्रवाशांना केले आहे.



संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Mayor Election : मुंबईत ‘खेला’ होणार, महापालिकेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर बसणार? ; बड्या नेत्याचं एकनाथ शिंदेंना आवाहन!

IND vs NZ 2nd T20I : सुसाट सुटलेल्या न्यूझीलंडला हर्षित राणाने रोखले, विकेटनंतर केला 'तो' इशारा; नेमका अर्थ काय? VIDEO

Maharashtra Schemes: आरोग्य, शिक्षण आणि समाजकल्याणावर लक्ष... एकनाथ शिंदेंकडून अनेक योजनांची घोषणा; जाणून घ्या कोणत्या?

Insurance: मृत्यू किंवा अपघातानंतर क्रेडिट बिल किंवा कर्ज कोण भरणार? 'हा' विमा ठरू शकतो संरक्षणाची ढाल; वाचा विम्याची भूमिका

मुरांबा फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात ! लग्नाचे फोटो चर्चेत, 'या' क्षेत्रात करते पत्नी काम

SCROLL FOR NEXT