imtiaz jalil 
छत्रपती संभाजीनगर

वक्फ बोर्डाच्या जागेवर शंभर कोटींचा घोटाळा - खा. इम्तियाज जलील

सुनिल इंगळे

औरंगाबाद: जालना रोडवरील वक्फ बोर्डाच्या जागेची विक्री करून शंभर कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.

जालना रोडवरील औरंगाबाद वक्फ बोर्डाच्या जागेवर अवैधरित्या अतिक्रमण करून बेकायदेशीर व नियमबाह्य बांधकाम करून जवळपास शंभर कोटी रुपयांचा महाघोटाळा केल्याचा आरोप शनिवारी खासदार जलील यांनी केला. या घोटाळ्यात अप्रत्यक्षरीत्या सहकार्य करणाऱ्या वक्फ बोर्ड, महापालिका, रजिस्ट्री ऑफिस तसेच टाउन प्लॅनिंगच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली.

तसेच या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल न झाल्यास २६ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा जलील यांनी दिला. दरम्यान वक्फ बोर्डाच्या जागेचे विक्री होत नसल्याने काही बड्या धनसेठयांनी अधिकाऱ्यांना लाखों रुपये देऊन नियमबाह्य कामे केली असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान हे प्रकरण न्यायालयात गेले असून न्यायालयाने येथे बांधकामावर स्थगिती दिली आहे. तरीही येथे नियमबाह्य शॉपिंग कॉम्प्लेक्सचे काम सुरू असल्याचे जलील म्हणाले. या प्रकरणाची गृहमंत्री अनिल देशमुख यांना माहीत दिली असून देशमुख यांनी उच्चत्तम चौकशीचे आदेश देण्याचे आश्वासन दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Dispute : 'तृणमूल'च्या नाव-चिन्हाचा वाद; सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश, निवडणूक आयोगाला ४ महिन्यांची मुदत

Kolhapuri Jaggery Crisis : कोल्हापुरी गुळाचा ब्रँड धोक्यात? गुऱ्हाळघरे बंद पडण्याच्या मार्गावर; एका आदणावर शेतकऱ्याला होतोय तब्बल 2 हजार रुपयांचा तोटा

अंबरनाथ, बदलापूरवर पाणीकपातीचे संकट गडद; उल्हास नदी सर्वाधिक गढूळ, ३७० 'एनटीयू'वर प्रमाण

Latest Marathi News Live Update : जम्मू-काश्मीर विधानसभेत राज्याचा दर्जा बहाल करण्याचा ठराव बहुमताने मंजूर; भाजपचा सभात्याग

School Safety: सीसीटीव्हीविना विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर; हिंगोली जिल्ह्यातील अनेक सरकारी, खासगी शाळा सुरक्षेच्या ‘नजरे’बाहेर, शिक्षण विभागाचे दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT