aurangabag crime news
aurangabag crime news 
छत्रपती संभाजीनगर

मेहुण्याने पत्नीचे लग्न दुसऱ्यासोबत लावून दिल्याने पतीची आत्महत्या

हबीबखान पठाण

पाचोड (औरंगाबाद): माहेरी गेलेल्या पत्नीचा विवाह मेहुण्याने त्याच्या मेहुण्यासोबत लावून दिल्याने पत्नीस आणावयास गेलेल्या पहिल्या पतीने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. १९) घडली आहे. पाचोड (ता.पैठण ) पोलिसांनी पत्नीसह, मेहुण्याविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शुक्रवारी (ता.२२) रात्री  मयताच्या पित्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.

यासंबंधी अधिक माहिती अशी की, रहेमान महादु चव्हाण (वय ७० वर्ष), खंडाळा (ता.पैठण) यांचा मुलगा मुकेश रहेमान चव्हाण (वय ३६ वर्ष) याचा विवाह साकेगाव (ता. पाथर्डी) येथील साक्षी वैभव काळे सोबत झाला होता. साक्षी तिच्या माहेरी आईवडीलांना भेटण्यासाठी गेली, ती जाऊन बरेच दिवस झाल्याने मुकेश तिला आणण्यासाठी सोमवारी(ता. १८) साकेगाव येथे गेला असता साक्षीचे भाऊ 'तथा' मुकेश चव्हाणचा मेहुणा अशपाक वैभव काळे याने साक्षीचा विवाह त्याचा मेहुणा बाल्या जैनराव भोसले रा. खडोबा एरंडगाव, (ता. शेवगाव, जि. नगर) सोबत लावून दिल्याचे लक्षात आले.

मेहुणा अशपाक काळे, धाऱ्या वैभव काळे यांनी केलेल्या पत्नी साक्षीच्या दुसऱ्या विवाहामुळे मुकेश यास मानसिक धक्का बसला. त्याने तणावात दारू प्राशन करुन त्यावर विषारी औषध घेतले, ही बाब अशपाक काळे व धाऱ्या काळे यांच्या लक्षात येताच त्यांनी मुकेश चव्हाण यास मंगळवारी (ता. १९) त्याला मोटार सायकलवर बसवून खंडाळा येथे आणून सोडले व कुणाला काही एक न सांगता निघून गेले.

यावेळी मुकेश याने घडलेला सर्व प्रकार कुटुबियांना सांगून आपल्या छातीत त्रास होत असल्याचे सांगीतले. त्यानुसार तातडीने कुंटबियांनी मुकेशला उपचारासाठी विहामांडवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र वैद्यकिय अधिकाऱ्याने त्यास तपासून मृत घोषित केले. बुधवारी (ता. २०) सकाळी पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल येरमे, पोलीस उपनिरीक्षक गोरक्षनाथ खरड यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करून उत्तरणीय तपासणीसाठी वैद्यकिय अधिकाऱ्यास अहवाल दिला.

डॉक्टरांनी विषारी औषध प्राशन केल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल दिला असुन मुकेशच्या आत्महत्येस  त्याचे मेहूणे अशपाक काळे, घाऱ्या काळे, पत्नी साक्षी, बाल्या भोसले (साक्षीचा दुसरा नवरा) हेच जबाबदार असल्याचे मयताचे पिता रहेमान महादु चव्हाण (वय ७० वर्ष), खंडाळा (ता.पैठण) पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

पाचोड पोलिसांनी सबंधीत तक्रारीवरून उपरोक्त चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गोरक्षनाथ खरड करीत आहे.

(edited by- pramod sarawale)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT